n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">२४ या मालिकेचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वी पुणे येथे करण्यात आले होते. या मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना पुण्यातील वातावरण खूपच उष्ण होते. त्यामुळे मालिकेच्या टीमला इतक्या तापमानात चित्रीकरण करणे खूपच कठीण जात होते. या मालिकेचा निर्माता अजिंक्य देव टीमच्या खाण्याकडे स्वतः लक्ष देत असे. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी टीममधील सगळ्यांना मसाला दूध देण्याची त्याने व्यवस्था केली होती. या सगळ्यामुळे मालिकेची संपूर्ण टीम खूपच खूश होती. एकदा तर आशिष विद्यार्थीच्या आईने संपूर्ण टीमसाठी मासे बनवून दिले होते. या माशांवर सगळ्यांनीच ताव मारला. आशिषच्या आईने बनवलेल्या मासांची चव २४ची संपूर्ण टीम आजही विसरूनच शकली नाही असे ते सांगतात.