​आशिष चौधरीचा देव आनंद या मालिकेद्वारे कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 12:40 IST2017-06-23T07:10:21+5:302017-06-23T12:40:21+5:30

आशिष चौधरीने हमको इश्क ने मारा या मालिकेद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने हम परदेसी हो गये, एक ...

Ashish Chaudhary's Dev Anand shortlisted for this series | ​आशिष चौधरीचा देव आनंद या मालिकेद्वारे कमबॅक

​आशिष चौधरीचा देव आनंद या मालिकेद्वारे कमबॅक

िष चौधरीने हमको इश्क ने मारा या मालिकेद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने हम परदेसी हो गये, एक मुठ्ठी आसमान यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. हम परदेसी हो गये ही मालिका तर प्रचंड गाजली होती. मालिकांना मिळालेल्या प्रसिद्धीनंतर आशिष चित्रपटांकडे वळला. त्याने धमाल, पेईंग गेस्ट, डॅडी कुल यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. एक मुठ्ठी आसमान ही आशिषची मालिका 2013मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. यानंतर तो झलक दिखला जा या कार्यक्रमात दिसला होता. पण गेली काही वर्षं तो छोट्या पडद्यापासून दूर आहे. आता तो देव आनंद या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर झळकणार आहे. 
देव आनंद या मालिकेत एका चिकित्सक गुप्तहेराचे जीवन दाखवण्यात आले आहे. निरीक्षण आणि तर्कशास्त्र यांच्यानुसार देव अनेक रहस्यमय केसेस सोडवणार आहे. देव आनंद ही भूमिका साकारण्यासाठी आशिष चौधरीच योग्य असल्याचे या मालिकेच्या टीमचे म्हणणे होते. या मालिकेविषयी आशिष सांगतो, मला कित्येक दिवसापासून छोट्या पडद्यावर परतायचे होते. पण मी एका चांगल्या कथेची वाट पाहात होतो. खरे तर देव आनंद या मालिकेविषयी मला विचारण्यात आले, त्यावेळी या मालिकेत मी काम करेन असा मी विचार देखील केला नव्हता. आपण केवळ मालिकेचे कथानक ऐकून येऊया आणि मग ठरवूया असे माझ्या डोक्यात पक्के होते. पण ही कथा ऐकल्यानंतर देव आनंदच्या व्यक्तिमत्त्वाने आणि या पात्राच्या अस्वाभाविक विक्षिप्त कृतींनी मला भुरळ घातली आणि त्यामुळेच मी ही मालिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला. ही एक असाधारण कथा असून प्रेक्षकांना ही मालिका खूप आवडेल अशी मला आशा आहे. 

Web Title: Ashish Chaudhary's Dev Anand shortlisted for this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.