‘अरूदीप’ची जोडी तुटली? अरूणिताने ऐनवेळी सोडला पवनदीप राजनचा म्युझिक व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 14:48 IST2021-12-06T14:47:06+5:302021-12-06T14:48:03+5:30
Pawandeep Rajan- Arunita Kanjilal : ‘इंडियन आयडल 12’ शो संपला आणि ‘अरूदीप’नं एकत्र असे अनेक म्युझिक व्हिडीओ व इव्हेंट केलेत. शिवाय म्युझिक डायरेक्टर राज सूरानी यांच्या म्युझिक व्हिडीओची सीरिजही साईन केली. पण आता अरूणिताने ही सीरिज सोडल्याचं कळतंय.

‘अरूदीप’ची जोडी तुटली? अरूणिताने ऐनवेळी सोडला पवनदीप राजनचा म्युझिक व्हिडीओ
‘इंडियन आयडल 12’चा (Indian Idol 12) विजेता पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि शोची फर्स्ट रनर-अप अरूणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) या जोडीनं आपल्या मधूर आवाजानं चाहत्यांना जणू वेड लावलं आहे. शो दरम्यान या एका जोडीची सर्वाधिक चर्चा झाली. त्यांच्या आवाजावर फॅन्स फिदा होतेच, पण त्यांची केमिस्ट्रीही लोकांना भावली. शो संपला आणि या जोडीनं एकत्र असे अनेक म्युझिक व्हिडीओ व इव्हेंट केलेत. शिवाय म्युझिक डायरेक्टर राज सूरानी यांच्या म्युझिक व्हिडीओची सीरिजही साईन केली. पण आता अरूणिताने ही सीरिज सोडल्याचं कळतंय. चर्चा खरी मानाल तर, आई-वडिलांच्या विरोधानंतर अरूणिताने या सीरिजमधून एक्झिट घेतलीये.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘इंडियन आयडल 12’च्या सेटवर अरूणिता व पवनदीप यांच्या लिंकअपच्या अनेक बातम्या आल्या. अरूणिताची आई सुरूवातीपासूनच या अशा बातम्यांच्या विरोधात होती. अशात राज सूरांनी यांनी पवनदीप व अरूणिताला आपल्या म्युझिक व्हिडीओसाठी साईन केलं, तेव्हा अरूणिताच्या वडिलांनी एक मोठी अट ठेवली होती. म्युझिक व्हिडीओत पवनदीप व माझ्या मुलीमध्ये एकही इंटिमेट सीन शूट होणार नाही, अशी ही अट होती. तेव्हा सूरांनींनी अरूणिताच्या वडिलांच्या समोर शूट होतील, असं सांगून त्यांची समजूत काढली होती.
पहिल्या व्हिडीओचे शूटींग सुरू झाल्यावर अरूणिताच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीसाठी एक लेडी मॅनेजर अपॉइंट केली. ती सतत अरूणितासोबत राहायची. मात्र दुसरा व्हिडीओ शूट करण्याची वेळ आली तेव्हा ऐनवेळी अरूणिताने तो करण्यास नकार दिला. याऊपरही दुस-या व्हिडीओचं बरंच शूटींग झालं होतं.
राज सूरानी नाराज!
अरूणिताने दुसरा व्हिडीओ शूट करण्यास नकार दिल्यामुळे म्युझिक डायरेक्टर राज सूरानी प्रचंड नाराज असल्याचं कळतंय. अरूणिताने या व्हिडीओत काम करू नये, अशी तिच्या पालकांची इच्छ होती. पण तिला काम करायचं नव्हतं तर तिने विदेशातील शो का केलेत? कदाचित हा अरूणिताच्या कुटुंबाचा निर्णय आहे. पण मी यामुळे प्रचंड नाराज आहे, असं राज सूरानी एका पोर्टलशी बोलताना म्हणाले.