आई कुठे काय करते: अनेक अडचणीनंतर आशुतोषच्या साथीने अखेर अरुंधतीला मिळणार तिच्या हक्काचं नवं घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 13:20 IST2022-02-26T13:19:35+5:302022-02-26T13:20:36+5:30

आपलंस वाटणारं कथानक आणि तेवढीच आपलीशी वाटणारी पात्र यामुळे ही मालिका घराधरातील गृहिणींची आवडती मालिका बनली आहे.

Arundhati will finally get her home with help of Ashutosh in Aai kuthe kay karte serial | आई कुठे काय करते: अनेक अडचणीनंतर आशुतोषच्या साथीने अखेर अरुंधतीला मिळणार तिच्या हक्काचं नवं घर

आई कुठे काय करते: अनेक अडचणीनंतर आशुतोषच्या साथीने अखेर अरुंधतीला मिळणार तिच्या हक्काचं नवं घर

स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित होणारी ‘आई कुठे काय करते’ अल्पावधीत लोकप्रिय झाली. दिवसेंदिवस या मालिकेतील कथानक रंजकदार वळण घेत असल्यामुळे पुढच्या भागात नेमकं काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता असते. आपली सगळी स्वप्न, इच्छा आकांक्षा सगळं विसरून अरूंधती कुटुंबासाठी झटते. परंतु कुटुंबाला त्याची जाणीवही नसते. नवऱ्यापासून सगळेच तिला कमी लेखतात. तिच्या या आयुष्यात कसोटीचे क्षण येतात. आपलंस वाटणारं कथानक आणि तेवढीच आपलीशी वाटणारी पात्र यामुळे ही मालिका घराधरातील गृहिणींची आवडती मालिका बनली आहे.

नुकतंच अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं आहे. यावेळी तिला आशुतोषची खंबीर साथ मिळाली आहे. हळूहळू आशुतोषच्या मनात अरूंधतीविषयी प्रेम भावना निर्माण झाली आहे. आता तो थेट देशमुख कुटुंबासमोर अरुंधतीवरील आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे. तसेच अरुंधतीला आशुतोषच्या साथीने  तिच्या हक्काचं नवं घर मिळणार आहे. अरुंधतीने देशमुखांचं घर सोडल्यानंतर ती हक्काच्या घराच्या शोधात होती. आता तिला लवकरच तिच्या हक्काचं घर मिळणार आहे. 

संजनाचा तिरस्कार करणारी कांचन आता अनिरुद्धच्या प्रेमाखातर तिच्याशी मैत्री करत आहे. इतकंच नाही तर या दोघींनी मिळून अरुंधतीकडून तिचं राहतं घरदेखील हिसकावून घेतलं. विशेष म्हणजे अरुंधतीदेखील कशाचाही मोह न करता तिच्या वाट्याचा हिस्सा कांचनच्या नावे करते. त्यामुळेच आता या मालिकेत कोणतं रंजकदार वळण येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: Arundhati will finally get her home with help of Ashutosh in Aai kuthe kay karte serial