अरुंधती-आशुतोषचा म्युझिक अल्बम होणार धुमधडाक्यात लाँच, अनिरुद्ध-संजनाचा होणार जळफळाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 17:17 IST2022-03-15T17:17:17+5:302022-03-15T17:17:37+5:30
Aai Kuthe Kay Karte:'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत लवकरच अरुंधतीचा पहिला अल्बम लाँच होणार आहे.

अरुंधती-आशुतोषचा म्युझिक अल्बम होणार धुमधडाक्यात लाँच, अनिरुद्ध-संजनाचा होणार जळफळाट
आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत लवकरच अरुंधतीचा पहिला अल्बम लाँच होणार आहे. अरुंधतीची प्रगती पाहून अनिरुद्ध आणि संजनाचा जळफळाट होताना दिसणार आहे.
मालिकेत नुकतीच आशुतोष अरुंधतीवरील एकतर्फी प्रेमाची कबुली देशमुख कुटुंबासमोर देतो. त्याचा फायदा घेत संजना ईशाला अरुंधती विरोधात भडकवते. तुझी आई आशुतोषसोबत लग्न करणार आहे आणि तुला याबद्दल काहीच माहित नाही. ईशा आशुतोषला भेटते आणि तिचा हा गैरसमज दूर होतो. लवकरच अरुंधतीचा पहिला म्युझिक अल्बम लाँच होणार आहे. त्यामुळे सध्या त्याचे प्लानिंग जोरदार सुरू आहे. देशमुख कुटुंबातील काही सदस्य खूप उत्सुक आहेत. तेदेखील या लाँचला उपस्थित राहणार आहेत.
एकीकडे देशमुख कुटुंबातील ईशा, अनघा, यश, आप्पा आणि अविनाश अरुंधतीच्या पहिल्या म्युझिक अल्बमसाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे अनिरूद्ध, कांचन आम्ही येणार नाही असे सांगते. संजना अनिरुद्धला माझ्यासाठी या इव्हेंटला ये असे सांगते. मी सगळे प्लानिंग केले आहे ते पाहण्यासाठी ये असे सांगू त्याला तयार करते.
मराठी सिरियल्सच्या रिपोर्टनुसार, आगामी भागात अरूंधती आणि आशुतोषच्या पहिल्या म्युझिक अल्बमचा इव्हेंट धुमधडाक्यात पार पडणार आहे. अरुंधतीला मिळणारे प्रेम आणि प्रसिद्धी पाहून संजना आणि अनिरुद्धचे तोंड बंद होणार आहे. आता या इव्हेंटनंतर अरुंधतीच्या आयुष्यात काय बदल होतो आणि यावरून देशमुख कुटुंबात काय नवीन वाद होतात, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.