‘रामायण’ने मला अफाट लोकप्रियता दिली, पण...! अरूण गोविल यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 13:22 IST2020-02-02T13:18:42+5:302020-02-02T13:22:40+5:30

- म्हणून मनोरंजन विश्वातून लांब राहिले 'राम'

Arun Govil, Who Played Ram In Ramanand Sagar's Ramayan, Says His Career 'Came To Standstill' After The Show | ‘रामायण’ने मला अफाट लोकप्रियता दिली, पण...! अरूण गोविल यांची खंत

‘रामायण’ने मला अफाट लोकप्रियता दिली, पण...! अरूण गोविल यांची खंत

ठळक मुद्देचांगली संधी आली तर मनोरंजन विश्वास परत यायला आवडेल असेही ते म्हणाले.

८० च्या दशकात आलेल्या ‘रामायण’ या मालिकेइतकी लोकप्रियता खचितच कुण्या मालिकेला मिळाली असेल. लोकप्रियतेचे शिखर गाठणा-या या मालिकेतील कलाकारांना आजही अनेक लोक देवासारखे मानतात.  या मालिकेत अरुण गोविल यांनी प्रभू रामाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका इतकी अफाट गाजली की, लोक चक्क घरामध्ये प्रभू श्रीरामाचा फोटो म्हणून त्यांचा फोटो लावू लागले होते. आजही अनेक लोक अरूण गोविल यांच्या पाया पडतात. एकंदर काय तर या मालिकेने अरूण गोविल यांना  लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. पण सोबत त्यांचा एक तोटाही केला. होय, खुद्द अरूण गोविल यांनी एका ताज्या मुलाखतीत याबद्दल सांगितले.

‘गेल्या १४ वर्षांत मी चित्रपट किंवा मालिका केल्या नाहीत. काही कार्यक्रमात विशेष पाहुण्याच्या भूमिकेत मी दिसलो पण पलिकडे मी काहीच केले नाही. या मालिकेने मला लोकप्रियता दिली मात्र माझे बॉलिवूडमधील करिअर मात्र या मालिकेसोबतच संपले. कारण या मालिकेनंतर कोणताही निर्माता मला काम देत नव्हता’, अशी खंत गोविल यांनी टाइम्स आॅफ इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलून दाखवली.

 रामायण सुरु होण्याआधी मी हिंदी चित्रपटात काम करत होतो.मालिका संपल्यानंतर मला बॉलिवूडमध्ये परतायचे होते. पण ते जमले नाही. कुठलाही निर्माता दिग्दर्शक मला काम द्यायला तयार होईना. रामाची भूमिका साकारल्याने तुमची वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. ही प्रतिमा खूपच प्रभावी आहे, ती खोडून आम्ही  तुम्हाला सहाय्यक अभिनेत्याची किंवा इतर लहान-मोठ्या भूमिका देऊ शकत नाही, असे मला लोक तोंडावर सांगत.

एका मालिकेने मला देशभरातील प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. पण याचमुळे माझे करिअर थांबले. गेल्या १४ वर्षांत मी चित्रपट किंवा मालिका केल्या नाहीत, केवळ विशेष पाहुणा म्हणून क्वचीत काही कार्यक्रमांना तेवढा हजर राहिलो. असे अरूण गोविल म्हणाली. चांगली संधी आली तर मनोरंजन विश्वास परत यायला आवडेल असेही ते म्हणाले.

Web Title: Arun Govil, Who Played Ram In Ramanand Sagar's Ramayan, Says His Career 'Came To Standstill' After The Show