प्रेमाच्या रंगाची उधळण करणार कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 16:16 IST2017-02-12T10:46:14+5:302017-02-12T16:16:14+5:30

व्हॅलेंटाईन डे ची चाहूल लागताच प्रत्येक व्यक्ती ही प्रेमाच्या रंगाची उधळण करण्यास सज्ज होत असते. कारण व्हेलेंटाईन्स डे हा ...

Artists trying to extricate the color of love | प्रेमाच्या रंगाची उधळण करणार कलाकार

प्रेमाच्या रंगाची उधळण करणार कलाकार

हॅलेंटाईन डे ची चाहूल लागताच प्रत्येक व्यक्ती ही प्रेमाच्या रंगाची उधळण करण्यास सज्ज होत असते. कारण व्हेलेंटाईन्स डे हा सगळ्यांसाठीच अगदी स्पेशल असतो. हा दिवस प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. ते म्हणतात ना प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमच आमचं सेम असतं ... जगातील सगळ्यात सुंदर भावना म्हणजे प्रेम. प्रत्येक व्यक्ती प्रेम हे वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करते. याच प्रेमाच्या रंगाची उधळण कलाकारादेखील करणार आहेत. ते पण खास आपल्या प्रेक्षकांसाठी. अनेकविध रंग आणि छटा उलगडून दाखवणारा लव्हेबल कार्यक्रम तुझी माझी लव्ह लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. 
       
            तुझी माझी लव्ह स्टोरी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्ण पेठे - सुव्रत जोशी हे कलाकार करणार आहेत. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके अभिनेते म्हणजेच सरस्वती मालिकेमधील आस्ताद काळे (राघव), तितिक्षा तावडे (सरस्वती) यांनी सगळ्यांना आवडलेल्या हम्मा हम्मा तसेच लडकी कर गई चूल या धम्माकेदार गाण्यावर डान्स केला तर सख्या रे मालिकेमधील सुयश टिळक (समीर, रणविजय) रुची सवर्ण मोहन (प्रियंवदा) यांनी लेट्स नाचो या गाण्यावर डान्स केला. तसेच आपल्या खुशखुशीत विनोदशैलीने संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडणाºया कलाकारांनी त्यांच्या विनोदाने जमलेल्या सर्व प्रेक्षकांना हसवले. मानसी कुलकर्णी, भक्ती रत्नपारखी, योगेश शिरसाट आणि समीर चौगुले यांनी अफलातून कॉमेडी लव्हेबल स्कीट केले जे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. आपल्या अदांनी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली, जिच्या नृत्याचे सगळेच दिवाने आहेत अशी नृत्यांगना मानसी नाईक आणि सिध्देश पै यांच्या नृत्यातून प्रेमाच्या अनेक छटा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम नक्कीच व्हेलेंटाईन डेच्या आनंदाला चार चाँद लावतील हे नक्की. 
       
             शाळेपासून कॉलेजपर्यंत तसेच लग्नानंतर असलेल्या प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना नृत्य आणि स्कीटच्या रुपात पहायला मिळणार आहे. पहिले प्रेम हे नेहेमीच सगळ्यांच्या जवळचे असते या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहचावल्या चिमुकल्यांनी त्यांच्या सुंदर नृत्यातून. टिक टिक वाजते आणि हृदयात वाजे या गाण्यातूनत्या वयातील निरागस प्रेम हे चिमुकल्या मुलांनी आपल्या नृत्यातून दाखविले. या कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली जेंव्हा केतकी माटेगावकर हिने आपल्या सुरेल आणि मधुर आवाजामध्ये प्रियकरा आणि जीव गुंतला हे गाणे गाऊन जमलेल्या सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. वैभव तत्ववादी याने सावर रे आणि येड लागले या गाण्यावर पॉवरपॅक डान्स केला ज्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा वर्षाव केला आणि डान्सला उत्तम प्रतिसाद दिला. तसेच पुष्कर जोग, मृण्मयी गोंधळकर या दोघांनी जनम जनम आणि आशिकी 2 मधील हम तेरे बिन या रोमँटिक गाण्यावर खूप सुंदर डान्स सादर केला तर पुष्कर जोग, मीरा जोशी आणि संकेत पाठक यांनी ए दिल है मुश्कील, इश्क वाला लव्ह या गाण्यावर परफॉर्मन्स केला. त्यामुळे हा दिवस प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. 

 

Web Title: Artists trying to extricate the color of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.