‘टीआरपी’च्या गणितात कलाकारांनी पडू नये- शुभांगी लाटकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 10:39 IST2016-09-04T16:46:40+5:302016-09-23T10:39:10+5:30

-रूपाली मुधोळकर ‘संयुक्त’ ही हिंदी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. काळाच्या ओघात -हास होत चाललेल्या संयुक्त कुटुंब व्यवस्थेचे ...

Artists should not fall in TRP's mathematics - Shubhangi will be laughing | ‘टीआरपी’च्या गणितात कलाकारांनी पडू नये- शुभांगी लाटकर

‘टीआरपी’च्या गणितात कलाकारांनी पडू नये- शुभांगी लाटकर

-रूपाली मुधोळकर


‘संयुक्त’ ही हिंदी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. काळाच्या ओघात -हास होत चाललेल्या संयुक्त कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व, त्याची गरज व्यक्त करणारी ही मालिका येत्या ६ सप्टेंबरपासून झी वाहिनीवर सुरु होत आहे. ज्येष्ठ अभिनेते किरण कुमार आणि ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी लाटकर हे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने शुभांगी लाटकर यांनी ‘लोकमत’च्या नागपूर कार्यालयास भेट दिली. यावेळी रंगलेल्या मनमोकळ्या गप्पांचा सारांश खास आमच्या वाचकांसाठी...

प्रश्न : ‘संयुक्त’ या नावावरून ही मालिका संयुक्त कुटुंबाभोवती फिरणारी आहे, हे समजतेच. याशिवाय प्रेक्षकांनी ही मालिका का पाहावी?
शुभांगी : ‘संयुक्त’ ही मालिका एका संयुक्त कुटुंबाची कथा आहे. आधी सगळे एका कुटुंबात गुण्यागोविंदाने नांदायचे. पण गेल्या काही वर्षांत विभक्त कुटुंब पद्धती फोफावली.अर्थात सध्या एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळतो आहे. मुलं-बाळ होईपर्यंत मुलांना आईवडिलांची गरज नसते. मात्र मुलं-बाळ झालीत की अर्थात गरज पडली की,आई-वडिलांना जवळ बोलवले जाते. मुळात गरजेसाठी नाही तर प्रेमासाठी कुटुंब एकत्र यायला हवं, हेच आम्ही आमच्या मालिकेतून सांगणार आहोत. अर्थात यात केवळ उपदेश नसून  मनोरंजनही आहे.  मी आणि किरण कुमार आमच्यासारखे ज्येष्ठ कलाकार या मालिकेच्या लीड रोलमध्ये आहेत.

प्रश्ल: या मालिकेत खलनायक वा खलनायिका नाही, असे आम्ही ऐकले आहे.
शुभांगी : होय, या मालिकेत खलनायक वा खलनायिका नाहीत. आपल्या कुटुंबात खलनायक वा खलनायिका नसतात. म्हणून आमच्या मालिकेतही ही खलनायक नावाची कुठलीही प्रवृत्ती नाही.

प्रश्न :  मराठी मालिका, मराठी चित्रपट, हिंदी मालिका व हिंदी चित्रपट या सर्व क्षेत्रात तुमची एक स्वतंत्र ओळख आहे. पण यापैकी तुम्हाला कामाचे मानसिक समाधान देणारे क्षेत्र कुठले?
शुभांगी : हिंदी चित्रपट. हिंदी चित्रपटांमध्ये काम करायला मला मनापासून आवडते. हिंदी चित्रपटाचा आवाका मोठा असतो. यात काम करण्याचे समाधान काही औरच.  सध्या मी ‘जॉली एलएलबी’ करतेय.  ‘फोर्स2’मध्येही मी दिसणार आहे. ‘एम ए. पास’ हा माझा चित्रपट पुढील महिन्यात रिलीज होतो आहे. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहे. शिवाय ‘दोस्तीगिरी’, ‘विडा’ हे मराठीतील माझे सिनेमेही लवकरच येत आहेत.

प्रश्न : बदलत्या ट्रेंडसोबत मराठी मालिका आणि हिंदी मालिकांमध्ये काही ठळक बदल तुम्हाला जाणवतो का?
शुभांगी : मराठी मालिका चांगल्या आहेत. चांगले कथानक, चांगले कलाकार, चांगले दिग्दर्शक याबाबतीत मराठी मालिका हिंदी मालिकांच्या तुलनेत तसूभरही कमी नाहीत. पण बजेटचे गणित मांडतांना या मालिका हिंदी मालिकांच्या तुलनेत कुठेतरी पिछाडतात. बस्स एवढेच.

प्रश्न : सध्या टीव्हीवर एक वेगळा ट्रेंड पाहायला मिळतो आहे. टीआरपी मिळेनासा झाला की धडाधड मालिका बंद होत आहेत. मालिका अशी अचानक बंद होणे वा त्यातील स्वत:चा स्लॉट बदलला जाणे, याचा मानसिक त्रास होतो का?
शुभांगी : माझ्या स्वत:बद्दल सांगायचे झाल्यास तर मालिका बंद झाल्याचा मला कधीही त्रास असा होत नाही. कारण एक मालिका बंद झाली की, दुसºया भूमिकेचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जाणार असतात. खरे तर मालिकांमध्ये सर्व बदल अपेक्षितच असतात. तुमची व्यक्तिरेखा कधी बाद केली जाईल, तिला कसे वळवले जाईल, हे कुणालाच माहित नसते. कलाकार म्हणून याचा त्रास होतो. पण शेवटी हे टीआरपीचे गणित आहे.  कलाकारांनी यात पडायचे नाही, असेच सांगितले जाते. शेवटी हे सगळं स्वीकारण्याशिवाय पर्यायही नसतो.

प्रश्न : मालिकांचे निर्माते कलाकारांना अक्षरश: पिळून घेतात, असा आरोप अलीकडे काही कलाकारांनी केला. यात किती सत्यता आहे?
शुभांगी : छे, छे! मला असे अजिबात वाटत नाही. कलाकारही निर्मात्यांना कमी सतावत नाही.(हसत हसत) स्वत: निर्मातेही कलाकारांपेक्षा अधिक तास काम करतात. आज कुठल्याही क्षेत्रात जा, कामाला पर्याय नाही.



प्रश्न : नवीन पिढीसोबत काम करण्याचा आपला अनुभव काय सांगतो?
शुभांगी : नवीन पिढीसोबत काम करताना मला थक्क व्हायला होत. ही पिढी म्हणजे मल्टीटास्किंग पिढी आहे. ही पिढी प्रचंड कष्टाळू आहे. तिचे व्हिजन एकदम क्लिअर आहे. ती अतिशय सॉर्टेड आहे. ही पिढी कमालीची आॅर्ननाईज्ड आहे. तितकीच विनम्रही आहे. या पिढीला शॉर्टकट हवे असतात, असा आरोप होतो. पण मला तो मान्य नाही.  टेक्नॉलॉजी, सुख-सुविधांच्या रूपात या पिढीला शॉर्टकट्स उपलब्ध असतील तर ते त्यांनी का वापरू नयेत?

प्रश्न : अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचे तुमचे स्वप्न आहे. मराठी अशा कुठल्या कलाकार वा दिग्दर्शकासोबत काम करायला आवडेल?
शुभांगी : जब्बार पटेल, सुमित्रा भावे, नागराज मंजुळे यांच्यासोबत काम करायला मला नक्कीच आवडेल.

प्रश्न : आपण अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केले, यापैकी सगळ्यांत आवडती भूमिका कोणती?
cnxoldfiles/strong> ‘आशिकी2’ या चित्रपटात मी आरोही अर्थात श्रद्धा कपूरच्या आईची भूमिका साकारली आहे. त्या भूमिकेने मला एक नवी ओळख दिली. ती भूमिका मला मनस्वी आनंद देऊन गेली.

Web Title: Artists should not fall in TRP's mathematics - Shubhangi will be laughing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.