चला हवा येऊ द्याच्या मंचावर कलाकार पाहणार 'ट्रकभर स्वप्न'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 06:30 IST2018-08-09T11:10:52+5:302018-08-10T06:30:00+5:30

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली साडे तीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे

Artist will see huge dream on set of 'Chala Hawa Yeu Dya..." | चला हवा येऊ द्याच्या मंचावर कलाकार पाहणार 'ट्रकभर स्वप्न'

चला हवा येऊ द्याच्या मंचावर कलाकार पाहणार 'ट्रकभर स्वप्न'

ठळक मुद्दे प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली साडे तीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. डॉ. निलेश साबळे कॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही.

या आठवड्यात चला हवा येऊ द्या च्या मंचावर 'ट्रकभर स्वप्न' या चित्रपटाचे कलाकार सज्ज होणार आहेत. मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, मुकेश रिशी यांसारखे दिग्गज कलाकार मंचावर आल्यावर चला हवा येऊ द्या च्या विनोदवीरांनी एकच कल्ला केला. 'ट्रकभर स्वप्न'च्या टीमसाठी या विनोदवीरांनी 'दगडी चाळ' चित्रपटावर आधारित एक विनोदी स्किट सादर करून सर्वांना पोट धरून हसायला भाग पाडलं. निलेश साबळे डॅडी, भाऊ कदम सूर्या आणि श्रेया बुगडे कलरफुल म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

Web Title: Artist will see huge dream on set of 'Chala Hawa Yeu Dya..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.