अर्शी खानने केला धक्कादायक खुलासा, ‘त्या रात्री प्रियांक शर्मा मला करणार होता किस’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 21:02 IST2017-11-01T15:32:11+5:302017-11-01T21:02:11+5:30

गेल्या आठवड्यात दुसºयांदा बिग बॉसच्या घरात एंट्री करणाºया प्रियांक शर्माने घरात अशी काही आग लावली की, त्याची धग अजूनही ...

Arshi Khan did a shocking revelation, 'Last night, Priyank Sharma was going to do me!' | अर्शी खानने केला धक्कादायक खुलासा, ‘त्या रात्री प्रियांक शर्मा मला करणार होता किस’!

अर्शी खानने केला धक्कादायक खुलासा, ‘त्या रात्री प्रियांक शर्मा मला करणार होता किस’!

ल्या आठवड्यात दुसºयांदा बिग बॉसच्या घरात एंट्री करणाºया प्रियांक शर्माने घरात अशी काही आग लावली की, त्याची धग अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. कारण घरात प्रवेश करताच प्रियांकने अर्शी खानवर निशाना साधत तिचे खूप मोठे बिंग फोडले आहे. त्याने अर्शीच्या भूतकाळातील अनेक घटनांवरील पर्दाफाश केल्याने घरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात वीकेंड का वॉरमध्ये सलमान खाननेही त्याला चांगलेच सुनावले. आता अर्शीने प्रियांकवर पलटवॉर केला असून, त्याच्याबद्दल एक खळबळजनक खुलासा केला आहे. अर्शीच्या मते जेव्हा प्रियांक शर्मा घरात परतला तेव्हा तो तिला किस करू इच्छित होता.  

होय, अर्शी बंदगी कालराला सांगताना दिसली की, घरात आल्यानंतर प्रियांक तिच्याकडे आला, मला काही कळायच्या आत तो माझ्या इतक्या जवळ आला की, मला किस करणार होता. अर्शी खान आणि प्रियांकमधील वाद तसा खूपच जुना आहे. कारण घरात आल्यानंतर जेव्हा हीना खान आणि अर्शी यांच्यात वाद झाला होता तेव्हापासूनच प्रियांकने तिच्याविरोधात षडयंत्र रचण्यास सुरुवात केली होती. दुसºयांदा घरात प्रवेश केल्यानंतर त्याने अर्शीचे बरेचसे गुपित उघड केले. त्यामध्ये अर्शीचे पुणे-गोवा सेक्स स्कॅडल चांगलेच गाजले. 

खरं तर अर्शी बोलण्यावरून जरी वायफळ वाटत असली तरी तिने अद्यापपर्यंत कोणावरही पर्सनल अटॅक केला नाही. त्यामुळे सलमाननेदेखील अर्शीची बाजू घेत प्रियांकला खडेबोल सुनावले. अर्शीच्या मॅनेजरने तर प्रियांक  आणि सपना चौधरीवर गुन्हाही दाखल केला. या आठवड्यात अर्शी खान आणि प्रियांक शर्मा नॉमिनेशन प्रक्रियेतून सेफ झाले आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात नॉमिनेशनवरून या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद रंगण्याची शक्यता आहे. 

Web Title: Arshi Khan did a shocking revelation, 'Last night, Priyank Sharma was going to do me!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.