अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाला मराठी अभिनेत्रीची हजेरी, मुंबई इंडियन्सशी आहे खास कनेक्शन, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 09:47 IST2026-03-06T09:46:24+5:302026-03-06T09:47:22+5:30

क्रिकेट जगतातील महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक ५ मार्चला लग्नबंधनात अडकले. एका मराठी अभिनेत्रीने या लग्नसोहळ्यात सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. 

arjun tendulkar Saaniya Chandhok wedding marathi actress kajal kate attend with husband | अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाला मराठी अभिनेत्रीची हजेरी, मुंबई इंडियन्सशी आहे खास कनेक्शन, कोण आहे ती?

अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाला मराठी अभिनेत्रीची हजेरी, मुंबई इंडियन्सशी आहे खास कनेक्शन, कोण आहे ती?

Arjun Tendulkar And Saaniya Chandhok's Wedding : क्रिकेट जगतातील महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक ५ मार्चला लग्नबंधनात अडकले.  मुंबईतील द सेंट रेजिस हॉटेलमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. क्रिकेट, राजकारण आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. पण एका मराठी अभिनेत्रीने या लग्नसोहळ्यात सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. 

मराठी अभिनेत्री काजल काटेने तिच्या नवऱ्यासोबत अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाला हजेरी लावली होती. अर्जुनच्या लग्नातील फोटो शेअर करत काजलने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नासाठी काजलने खास लूक केला होता. लाल रंगाच्या साडीत ती नटली होती. तर तिचा नवरा प्रतिक कदमने सूट परिधान केला होता. प्रतिकचं मुंबई इंडियन्सशी खास कनेक्शन आहे. प्रतिक हा मुंबई इंडियन्सचा फिटनेस कोच आहे. 

दरम्यान, काजलने मुरांबा, माझी तुझी रेशीमगाठ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. नुकतंच काजल आणि तिच्या नवऱ्याने मर्सिडीज कंपनीची महागडी गाडी खरेदी केली आहे. फोटो शेअर करत तिने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. काजलचं चाहत्यांनी अभिनंदन केलं आहे.

Web Title : अर्जुन तेंदुलकर की शादी में मराठी अभिनेत्री, मुंबई इंडियंस से है कनेक्शन

Web Summary : अर्जुन तेंदुलकर ने सानिया चांडोक से 5 मार्च को शादी की। मराठी अभिनेत्री काजल काटे, अपने पति प्रतीक कदम (मुंबई इंडियंस फिटनेस कोच) के साथ शादी में शामिल हुईं। काजल, 'मुरांबा' और 'माझी तुझी रेशीमगाठ' में भूमिकाओं के लिए जानी जाती हैं, हाल ही में एक मर्सिडीज खरीदी।

Web Title : Marathi actress attends Arjun Tendulkar's wedding; Mumbai Indians connection revealed.

Web Summary : Arjun Tendulkar married Saaniya Chandhok on March 5th. Marathi actress Kajal Kate, with her husband Pratik Kadam (Mumbai Indians fitness coach), attended the wedding. Kajal, known for roles in 'Muramba' and 'Majhi Tujhi Reshimgath,' recently bought a Mercedes.