अभिनेता अर्जुन बिजलानीचा झाला गोव्यात अपघात, पुढच्या दोन दिवसात परतणार मुंबईत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 16:38 IST2020-08-20T16:26:55+5:302020-08-20T16:38:17+5:30
टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी कुटुंबीयांसह गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करायला गेला होता.

अभिनेता अर्जुन बिजलानीचा झाला गोव्यात अपघात, पुढच्या दोन दिवसात परतणार मुंबईत
टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी गोव्यात कुटुंबीयांसह व्हॅकेशन एन्जॉय करायला गेला होता. मात्र याच दरम्यान एका अपघातात तो जखमी झाला आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी अर्जुनला पुढील सहा आठवडे बेड रेस्ट सांगितला आहे. रिपोर्टनुसार अर्जुन म्हणाला की, आता त्याची सुट्टी संपली आहे, परंतु तो या अपघाताचा बळी ठरला आहे. अर्जुनाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो बेडवर आहे. अर्जुनने सांगितले तो घसरला होता आणि त्याचा पाय दोन दगडांच्यामध्ये अडकला.
अर्जुन म्हणाला की पावसामुळे समुद्राचा किनारा खूप निसरडा होता. एक-दोन दिवसांत तो घरी परत येईल. पण आता काम करु शकत नाही. अर्जुन कुटुंबासोबत लाँग व्हॅकेशनवर गेला आहे. सोशल मीडियावर तो फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससोबत शेअर करत असतो.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर अर्जुन, लवकरच डान्स दिवानाच्या तिसरा सीझनमध्ये कलर्स टीव्हीवर दिसणार होता. डान्स दिवानेचा होस्ट अर्जुन असणार आहे. अर्जुन बिजलानी एक प्रसिद्ध होस्ट आहे. त्याने बरेच कार्यक्रम होस्ट केले आहेत. याशिवाय त्याने नागिन, इश्क में मरजावां, परदेस में है मेरा दिल, मेरी आशिकी तुमसे ही, जो बीवी से करे प्यार सारख्या अनेक शोमध्ये तो दिसला आहे.