धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 22:49 IST2024-09-22T22:48:45+5:302024-09-22T22:49:37+5:30

आज बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधून अरबाज पटेल घराबाहेर गेला आहे. त्यामुळे घरातील सर्वांना धक्का बसलाय (arbaz patel, bigg boss marathi 5)

Arbaz Patel evicted from bigg boss marathi 5 Nikki tamboli jahnavi killekar cry | धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर

धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर

काल बिग बॉस मराठीमधून वैद्यकीय कारणास्तव संग्राम चौगुले घराबाहेर गेले. त्यानंतर आज घरात या आठवड्यातलं दुसरं एलिमिनेशन पार पडलं. यामध्ये अरबाज पटेलला बिग बॉस मराठीचं घर सोडावं लागलं आहे. या आठवड्यात वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल, निक्की तांबोळी आणि सूरज चव्हाण हे पाच जण नॉमिनेट होते. यापैकी अरबाजला प्रेक्षकांची कमी मतं मिळाल्याने बिग बॉस मराठीमधून बाहेर जावं लागलं आहे. त्यामुळे आज अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल बघायला मिळाला.

अरबाज बाहेर गेल्याने निक्की-जान्हवीला अश्रू अनावर

आज बिग बॉस मराठीच्या एलिमिनेशन राऊंडमध्ये या आठवड्यात नॉमिनेट असलेले पाचही सदस्य उभे होते. यावेळी एकामागोमाग एक सूरज, जान्हवी आणि वर्षा उसगांवकर सुरक्षित झाल्या. शेवटी निक्की आणि अरबाज डेंजर झोनमध्ये होते. या दोघांपैकी निक्की सेफ झाली तर अरबाजला घराबाहेर जावं लागलं. अरबाजलाही हा निकाल धक्कादायक असल्याने त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. तो निक्कीला मिठी मारून ढसाढसा रडला. इतकंच नव्हे तर घरातील अरबाजची खास मैत्रीण जान्हवीला सुद्धा अश्रू अनावर झाले. 


असा होता अरबाजचा घरातील प्रवास

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये अरबाजने वैभव चव्हाणसोबत प्रवेश केला होता. पहिल्या दोन आठवड्यात अरबाजने चांगला खेळ खेळला. इतकंच नव्हे तर याआधी एकदा घराचा कॅप्टनही झाला होता. परंतु नंतर अरबाजची निक्की तांबोळीसोबत जास्त मैत्री झाली. त्यामुळे तो गेममध्ये काहीसा वीक होत गेला. निक्कीसोबत असलेले रुसवेफुगवे संपूर्ण घराने बघितले. भाऊच्या धक्क्यावर रितेशने सुद्धा अरबाजची चांगलीच शाळा घेतली. अरबाज, वैभव, जान्हवी आणि निक्की यांचा एक ग्रुप होता. नंतर हा ग्रुप फुटला. शेवटपर्यंत कोणी कितीही बोललं तरीही अरबाज निक्कीसोबत होता. अखेर आज आठ आठवड्यांनी अरबाजला बिग बॉसमधून बाहेर जावं लागत आहे.

Web Title: Arbaz Patel evicted from bigg boss marathi 5 Nikki tamboli jahnavi killekar cry