अरबाज पटेल 'हिंदी बिग बॉस'मध्ये झळकणार? पोस्ट शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 14:26 IST2025-08-12T14:26:26+5:302025-08-12T14:26:46+5:30

लवकरच हिंदी 'बिग बॉस'चा १९वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Arbaaz Patel Rumours Participating Bigg Boss 19 Share Social Media Post Bigg Boss Marathi 5 Nikki Tamboli | अरबाज पटेल 'हिंदी बिग बॉस'मध्ये झळकणार? पोस्ट शेअर करत म्हणाला...

अरबाज पटेल 'हिंदी बिग बॉस'मध्ये झळकणार? पोस्ट शेअर करत म्हणाला...

टेलिव्हिजनवरील बहुचर्चित शो म्हणजे 'बिग बॉस'. मराठीसह हिंदी 'बिग बॉस'ही खूपच लोकप्रिय आहे. या शोचे अनेक सीझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत आणि या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांनीसुद्धा भरभरून प्रतिसाद दिला आहे. अशातच आता लवकरच हिंदी 'बिग बॉस'चा १९वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी 'बिग बॉस'चा पहिला प्रोमो समोर आल्यापासून या शोमध्ये सहभागी होणाऱ्या अनेक स्पर्धकांच्या नावांच्या चर्चा होताना दिसत आहेत. अशातच एक नाव म्हणजे 'मराठी बिग बॉस' फेम अरबाज पटेल हे चर्चेत आलंय.

'मराठी बिग बॉस'च्या पाचव्या पर्वात सहभागी झालेला छत्रपती संभाजीनगरचा अरबाज हा आता 'हिंदी बिग बॉस'मध्ये झळकणार अशी चर्चा सुरु झाली आहे. अरबाजने एक पोस्ट करत चाहत्यांना इशारा दिला आहे, ही पोस्ट निक्की ने देखील रिपोस्ट केली आहे.पोस्टमध्ये अरबाजने लिहलं की,  येत्या काही दिवसांत खूप मजा येणार आहे आणि खूप काही घडणार आहे. मी खूप उत्साहित आहे. माझा द्वेष करणाऱ्यांनो, तुमच्यासाठीही खूप येणार आहे, म्हणून कामाला लागा.आणि प्रेम करणाऱ्या लोकांसाठी, मी तर आहेच", असं अरबाजनं म्हटलं. यावर "तुझ्यासाठी टाळ्या वाजवण्याासठी आणि जल्लोष करण्यासाठी मी फार उत्सुक आहे" असं म्हणत निक्कीनं आनंद व्यक्त केलाय.

दरम्यान, अद्याप अधिकृत घोषणा बाकी आहे. बिग मराठीच्या घरात तो उत्कृष्ट खेळला होता. आता अरबाजला हिंदी बिग बॉसमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. 'बिग बॉस १९'मध्ये सहभागी होणाऱ्या काही संभाव्य स्पर्धकांची यादी आली आहे. ज्यात गुरुचरण सिंग, शैलेश लोढा, अपूर्वा मुखिजा, रफ्तार, मीरा देवस्थळे, धनश्री वर्मा अशा काही नावांच्या चर्चा आहेत. 'बिग बॉस'चा १९वा वा सीझन येत्या २४ ऑगस्टपासून रात्री १०:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो प्रेक्षकांना 'कलर्स टीव्ही' आणि 'जिओ हॉटस्टार'वर पाहायला मिळेल. 
 

Web Title: Arbaaz Patel Rumours Participating Bigg Boss 19 Share Social Media Post Bigg Boss Marathi 5 Nikki Tamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.