पायाला दुखापत झालेली असतानाही ए. आर. रेहमानने थांबवले नाही चित्रिकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 07:15 IST2019-01-17T07:15:00+5:302019-01-17T07:15:00+5:30
प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक ए आर रेहमान स्टारप्लसवरील दि व्हॉईसमध्ये सुपर गुरूच्या भूमिकेत दिसणार आहे.

पायाला दुखापत झालेली असतानाही ए. आर. रेहमानने थांबवले नाही चित्रिकरण
प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक ए आर रेहमान स्टारप्लसवरील दि व्हॉईसमध्ये सुपर गुरूच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या पायाला दुखापत झाली होती, डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता. मात्र तरीही रेहमान हे दि व्हॉईसच्या प्रमोशनल चित्रीकरणासाठी उपस्थित राहिला.
सूत्रांनुसार, “रेहमानच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे तरीही त्याने आपल्या कामात त्याचा व्यत्यय येऊ दिला नाही. प्रोमोचे चित्रीकरण ठरल्याप्रमाणे व्हावे असे त्याचे म्हणणे होते. या गोष्टीतून त्याची कामाप्रती निष्ठा दिसून येते. प्रोमो शूटच्या वेळेस आम्हाला खूप मजा आली आणि आम्ही त्याचा वाढदिवसही साजरा केला.”
दि व्हॉईसमध्ये ए. आर. रेहमानला सुपर गुरूच्या खुर्चीवर पाहायला खूपच उत्सुक आहेत. हा शो निश्चितपणे त्याच्या आंतरराष्ट्रीय आवृत्त्यांच्या तोडीस तोड आहे. जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेला उत्कृष्ट गायकांचा शो आणि चार एमी पुरस्कारांनी गौरविला गेलेला कार्यक्रम ‘द व्हॉइस’ने जगातील 180 देशांमध्ये विलक्षण लोकप्रियता संपादन केले आहे. यापूर्वी जगभर शकिरा, ख्रिस्तिना, अॅडाम लेव्हिन, अशर, मायली सायरस यासारखे आघाडीचे पॉप गायक या कार्यक्रमात प्रशिक्षक या नात्याने सहभागी झाले होते. लवकरच हा कार्यक्रम भारतात देखील प्रसारित होणार आहे.