"गळ्यात आहे मंगळसूत्र...", लग्नानंतर अपूर्वा नेमळेकरचा नवऱ्यासाठी खास उखाणा, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 12:01 IST2026-02-23T12:00:42+5:302026-02-23T12:01:22+5:30

लग्नानंतर आता अपूर्वा पहिल्यांदाच नवविवाहित म्हणून जवळच्याच लग्नात गेली होती. तिथे तिने नवऱ्याचा नाव घेत खास उखाणा घेतला. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे.

apurva nemlekar ukhana after her wedding for husband video | "गळ्यात आहे मंगळसूत्र...", लग्नानंतर अपूर्वा नेमळेकरचा नवऱ्यासाठी खास उखाणा, शेअर केला व्हिडीओ

"गळ्यात आहे मंगळसूत्र...", लग्नानंतर अपूर्वा नेमळेकरचा नवऱ्यासाठी खास उखाणा, शेअर केला व्हिडीओ

'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अपूर्वाने १४ फेब्रुवारीला तनुज गोवलकरसोबत लग्नगाठ बांधत नव्याने संसार थाटला आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिला चाहत्यांनी शुभेच्छाही दिल्या. लग्नानंतर आता अपूर्वा पहिल्यांदाच नवविवाहित म्हणून जवळच्याच लग्नात गेली होती. तिथे तिने नवऱ्याचा नाव घेत खास उखाणा घेतला. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे.

अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन लग्नातील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नवरा-नवरी उभे असून त्यांच्यासोबत अपूर्वा दिसत आहे. तर लग्नात तिला उखाणा घ्यायला सांगितला. नवऱ्याचं नाव घेत अपूर्वा म्हणाली, "गळ्यात आहे मंगळसूत्र, गळ्यात आहे मंगळसूत्र ही सौभाग्याची खून...तनुजरावांचं नाव घेते गोवलकरांची सून...". तिचा उखाणा ऐकताच सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. हा व्हिडीओ शेअर करत अपूर्वाने म्हटलं आहे की "मिसेस गोवलकर म्हणून अटेंड केलेलं हे पहिलंच लग्न...आकाश आणि सलोनी तुम्हाला आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी, आनंदासाठी आणि प्रेमासाठी शुभेच्छा". 


अपूर्वाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. आभास हा मालिकेतून अपूर्वाने टेलिव्हिजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये ती दिसली. पण, रात्रीस खेळ चाले मालिकेमुळे अपूर्वा प्रसिद्धीझोतात आली होती. तिने या मालिकेत साकारलेली शेवंता ही भूमिका प्रचंड गाजली होती. अपूर्वाने २०१४ मध्ये रोहन देशपांडेसोबत पहिलं लग्न केलं होतं. त्याआधी काही वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून अपूर्वा सिंगल होती. आता तिने नव्याने तिच्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

Web Title : अपूर्वा नेमलेकर ने शादी के बाद पति के लिए खास 'उखाना' शेयर किया।

Web Summary : हाल ही में तनुज गोवलकर से शादी करने वाली अपूर्वा नेमलेकर ने एक शादी में पारंपरिक 'उखाना' सुनाते हुए अपना एक वीडियो साझा किया, जिसमें उन्होंने अपने पति के लिए प्यार व्यक्त किया। यह उनकी दूसरी शादी है, इससे पहले उनका एक रिश्ता था।

Web Title : Apurva Nemlekar shares special 'ukhana' for her husband after marriage.

Web Summary : Apurva Nemlekar, recently married to Tanuj Govalkar, shared a video of herself reciting a traditional 'ukhana' at a wedding, expressing her love for her husband. This is her second marriage, following a previous relationship.