...अन् तिने होकार दिला! अपूर्वा नेमळेकरसाठी नवऱ्याचं रोमँटिक प्रपोजल, शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 12:35 IST2026-02-17T12:34:38+5:302026-02-17T12:35:08+5:30
अपूर्वासाठी तनुजची रोमँटिक पोस्ट

...अन् तिने होकार दिला! अपूर्वा नेमळेकरसाठी नवऱ्याचं रोमँटिक प्रपोजल, शेअर केली पोस्ट
'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली. १४ फेब्रुवारी रोजी तिने तनुज गोवळकरसोबत साता जन्माची गाठ बांधली. दुसऱ्या दिवशी थेट लग्नाचे फोटो पोस्ट करत अपूर्वाने चाहत्यांना सुखद धक्काच दिला. तिच्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. तनुज गोवळकरने अपूर्वाला समुद्रकिनारी प्रपोज केलं होतं. तो व्हिडीओ पोस्ट करत त्याने छान कॅप्शन दिलं आहे.
तनुज गोवळकर आणि अपूर्वा नेमळेकर समुद्रकिनारी एकत्र वेळ घालवत आहेत. अपूर्वाने पांढऱ्या रंगाचा वनपीस घातला आहे. तर तनुजने व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्स घातली आहे. दोघं हातात हात धरुन बीचवर एकत्र एन्जॉय करत आहेत. एकमेकांना मिठी मारत आहेत. तेवढ्यात तनुज गुडघ्यावर बसतो आणि हातात अंगठी घेऊन अपूर्वाला प्रपोज करतो. तिच्यासाठीही हे सरप्राईज असतं. ती आनंदाने होकार देते आणि तो तिच्या बोटात अंगठी घालतो. ते एकमेकांना किस करतात. हा सुंदर व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.
यासोबत तनुजने लिहिले, "आणि ती हो म्हणाली. एका वीकेंड गेटअवेला दिलेलं सरप्राईज प्रपोजल. हे स्क्रिप्टेड वाटू शकतं पण असंच नशिबात लिहिलं होतं. या सूर्यास्तावेळी जग जरी थांबलं तरी मी तिच्या एका हास्यावरही मरेल. कारण तिने होकार दिला आहे. २३.११.२०२५"
दरम्यान अपूर्वा नेमळेकरचं पहिलं लग्न रोहन देशपांडेशी झालं होतं. २०१४ साली त्यांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नव्हतं.यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर बरीच वर्षे ती सिंगल होती. आता अपूर्वा नेमळेकरच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आलं. तिने पुन्हा लग्नाला संधी देत तनुज गोवळकरसोबत लग्नगाठ बांधली.