'काही प्रवास एकट्यानेच..." अपूर्वा नेमळेकरची भावूक पोस्ट, काही दिवसांपूर्वीच भावाचं झालं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 10:42 IST2023-05-14T10:41:42+5:302023-05-14T10:42:35+5:30

अपूर्वाच्या सख्ख्या भावाचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. वयाच्या २८ व्या वर्षी त्याला हृदयविकाराचा झटका आला.

apurva nemlekar emotional post on social media after death of her brother | 'काही प्रवास एकट्यानेच..." अपूर्वा नेमळेकरची भावूक पोस्ट, काही दिवसांपूर्वीच भावाचं झालं निधन

'काही प्रवास एकट्यानेच..." अपूर्वा नेमळेकरची भावूक पोस्ट, काही दिवसांपूर्वीच भावाचं झालं निधन

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून शेवंता म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) 'बिग बॉस'मुळेही घराघरात पोहोचली. बिग बॉसमध्ये तर तिने टॉप २ पर्यंत मजल मारली. प्रोफेशनल लाईफ चांगली सुरु असली तरी अपूर्वाच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र वादळ आलं. तिच्या सख्ख्या भावाचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. वयाच्या २८ व्या वर्षी त्याला हृदयविकाराचा झटका आला. या दु:खातून अपूर्वा हळूहळू सावरत आहे. 

भावाच्या निधनानंतर अपूर्वाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अंधारात अपूर्वा एकटीच उदास बसली आहे. उजेडाकडे बघतानाचा तिचा फोटो आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "काही प्रवास हे एकट्यानेच करायचे असतात, आयुष्याच्या प्रत्येक प्रवासात जीवनसाथी सोबत नसतात."

अपूर्वाने या पोस्टमधून तिचं दु:ख व्यक्त केलं आहे. तर सहकलाकारांनी आणि चाहत्यांनी तिला धीर दिला आहे. अपूर्वाच्या वडिलांचंही निधन झालं आहे. तसंच ती तिने पतीपासून घटस्फोट घेतला आहे. तर आता भावाच्या निधनाने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मध्यंतरी तिच्या बहिणीचीही तब्येत खराब होती.  अपूर्वाची आई तर अक्षरश: तुटली आहे. आपल्या आईसाठी अपूर्वा धीराने पुन्हा उभी राहत आहे.

Web Title: apurva nemlekar emotional post on social media after death of her brother