'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेतील अप्पीचं थाटात पार पडलं डोहाळेजेवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 13:26 IST2023-10-31T13:22:34+5:302023-10-31T13:26:05+5:30
'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) मालिका आता ही मालिका रोमांचक वळणावर आली आहे.

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेतील अप्पीचं थाटात पार पडलं डोहाळेजेवण
मालिका विश्वातील मानाचा आणि झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अवॉर्ड’. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् यांनी कार्यक्रमाला एक वेगळीच बहार आणली. या सगळ्यासोबतच आणखी एक कार्यक्रम गाजला तो म्हणजे आपल्या ‘अप्पीचं डोळहळेजेवण’.
झी मराठीच्या सर्व नायिकांनी मिळून अप्पीचे डोहाळे पुरवणार आहेत. कलेक्टर अप्पीची PA म्हणजेच छोट्या छकुलीने एक धमाकेदार नृत्य केलं. सोबतच ह्या डोहाळेजेवण कार्यक्रमात हजेरी लावली ती बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने, माधुरीने अर्जुनला अप्पीची काळजी घेण्याचा प्रेमाचा सल्ला पण दिला. ऐवढच नाही तर माधुरी दीक्षितने झी मराठीच्या सर्व नायिकांसोबत मंगळागौर साजरी केली. सोबत रंगली ती माधुरी, भाऊ कदम आणि भुवनेश्वरीची हास्याची जुगलबंदी. ह्या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा सांभाळली ती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी जोडी अक्षरा आणि अधिपती यांनी.
ह्या डोहाळेजेवण कार्यक्रमात अप्पीचं कौतुक करायला आलेल्या सगळ्यांनी पेढा की बर्फी असं गोड प्रश्न विचार देखील. अप्पी काय निवडणार पेढा की बर्फी ? तेव्हा पाहायला विसरू नका ‘अप्पीच्या डोहाळेजेवणाचा’ हा धमाकेदार कार्यक्रम 'झी मराठी अवॉर्ड २०२३', शनिवार ४ नोव्हेंबर, संध्या. ७ वा, झी मराठीवर.