'हा शेटवचा म्हणत स्वीटूने शेअर केला फोटो, कॅप्शनमुळे चाहते पडले बुचकळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 14:53 IST2021-07-19T14:53:28+5:302021-07-19T14:53:55+5:30
स्वीटू म्हणजेच अन्विता फलटनकरणे तिचा साडीतला फोटो शेअर केला आहे. फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळेच चाहते संभ्रमात पडले आहेत.

'हा शेटवचा म्हणत स्वीटूने शेअर केला फोटो, कॅप्शनमुळे चाहते पडले बुचकळ्यात
अभिनेत्री अन्विता फलटणकर 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेमुळे प्रचंड चर्चेत आहे. मालिकेत तीन साकारलेली स्वीटू रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. अन्विता प्रमाणे इतरही भूमिकांनी रसिकांची पसंती मिळवली आहे. अन्विता म्हणजेच स्वीटू सोशल मीडियावर खूप सक्रीय असते आणि ती नेहमी येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील धमाल मस्तीचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. याशिवाय ती नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते.
स्वीटू म्हणजेच अन्विताने तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने साडी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत तिने एक कॅप्शनही लिहीले आहे. या कॅप्शनमुळेच चाहते संभ्रमात पडले आहेत. फोटोपेक्षा कॅप्शनचीच जास्त चर्चा रंगली आहे. अन्विताला नेमकं म्हणायचं तरी काय हे चाहत्यांना समजले नसल्यामुळे चांगलेच गोंधळात पडल्याचे पाहायला मिळत आहे.
अन्वितने फोटोला कॅप्शन दिली होती की, होय! गालामुळे डोळे लपतायत, मला माहितेय!तरीपण Red-y!😝♥️ हा शेटचा आहे. तिच्या या कॅप्शनमुळेच चाहतेही तिला वेगवेगळे प्रश्न विचारताना दिसत आहेत. तसेच फोटोवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आज अन्विता छोट्या पडद्यावर मुख्य अभिनेत्री म्हणून झळकत आहे. तिच्या अभिनयामुळेच तिने आज स्वतःला सिद्ध केले आहे. म्हणून अन्विताही रसिकांची आवडती अभिनेत्री बनली आहे. 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत सध्या ओम आणि स्वीटू दोघांचा लव्हस्टोरी दाखवण्यात येत आहे. या हटके लव्हस्टोरी आणि जोडीलाही रसिकांची भरभरुन पंसती मिळत आहेत. मालिकेत दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट आणि रंक घडामोडींमुळे रसिकही मालिकेला खिळून आहेत.