"त्याने रितिकाला मारहाण केली...", अनुराग डोभालच्या व्हिडीओनंतर भावाने सगळंच सांगून टाकलं, चॅट केले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 11:19 IST2026-03-06T11:12:25+5:302026-03-06T11:19:19+5:30

अनुरागने त्याच्या युट्यूबवरुन २ तासाचा व्हिडीओ शेअर करत आंतरजातीय लग्न केल्यामुळे सतत आईवडिलांकडून टॉर्चर होत असल्याचा आरोप केला होता. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचंही त्याने सांगितलं होतं. या सर्व आरोपांवर आता अनुरागचा भाऊ कलामने प्रतिक्रिया दिली आहे. 

anurag dobhal brother answer to you tuber allegations said he beated his wife | "त्याने रितिकाला मारहाण केली...", अनुराग डोभालच्या व्हिडीओनंतर भावाने सगळंच सांगून टाकलं, चॅट केले व्हायरल

"त्याने रितिकाला मारहाण केली...", अनुराग डोभालच्या व्हिडीओनंतर भावाने सगळंच सांगून टाकलं, चॅट केले व्हायरल

'बिग बॉस १७' फेम आणि लोकप्रिय युट्यूबर असलेला अनुराग डोभाल त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अनुरागने त्याच्या युट्यूबवरुन २ तासाचा व्हिडीओ शेअर करत आंतरजातीय लग्न केल्यामुळे सतत आईवडिलांकडून टॉर्चर होत असल्याचा आरोप केला होता. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचंही त्याने सांगितलं होतं. जर काही झालंच तर त्याच्या मृत्यूला आई,वडील आणि भाऊ जबाबदार असल्याचा आरोप अनुरागने केला होता. पत्नी रितिकाही त्याला सोडून गेली आहे. या सर्व आरोपांवर आता अनुरागचा भाऊ कलामने प्रतिक्रिया दिली आहे. 

कलामने अनुरागच्या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली होती. अनुरागच्या सगळ्या आरोपांना पुराव्यांसहित उत्तर देणार असल्याचं त्याने म्हटलं होतं. आता या आरोपांना त्याने उत्तर दिलं आहे. कलाम म्हणाला की "मी सगळे पुरावे माझ्या पॉडकास्ट चॅनेलवर शेअर केले आहेत. सगळ्यांनी चिल करा...हे अनुरागचं रोजचं काम आहे. हे सगळं तो व्ह्यूजसाठी करत असतो. त्याने फक्त त्याची बाजू सांगितली पण सत्य नाही सांगितलं. माझ्या सगळ्यांना चाहत्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही यात पडू नका. त्याने आमच्यावर एक खोटी केसही केली आहे. आणि जेव्हा तो ही केस हरला तेव्हा त्याने हा बकवास व्हिडीओ शेअर केला. कारण आता रितिकाही त्याला सोडून गेली आहे". 

कलामने त्याच्या जवळच्या व्यक्तीसोबत अनुरागसोबतच्या चॅटचे पुरावेही शेअर केले आहेत. अनुरागने रितिकाला मारहाण केली होती, असा दावा या चॅटच्या स्क्रीनशॉटमधून करण्यात आला आहे. या चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये अनुराग असं म्हणत आहे की "रितिका आणि माझ्यात भांडण झालं. ती तुझ्याबद्दल काहीतरी बोलली आणि मी तिला मारलं. मला तिला मारायचं नव्हतं. पण ती मला प्रवृत्त करत होती. चांगलीच लगावली आहे...आता शांत बसली असेल. सणसणीत कानाखाली मारली". अनुराग डोभालच्या घराचा वाद सगळ्यांसमोर आला आहे. अनुरागची परिस्थिती पाहून त्याचे चाहते चिंतेत आहेत. 

Web Title : अनुराग डोभाल ने कथित तौर पर पत्नी को पीटा, भाई ने चौंकाने वाले चैट खोले

Web Summary : यूটিউबर अनुराग डोभाल के भाई ने चैट उजागर किए जिसमें अनुराग पर पत्नी रितिका पर हमला करने का आरोप लगाया गया है। यह अनुराग के माता-पिता पर उत्पीड़न और रितिका पर उसे छोड़ने का आरोप लगाने वाले वीडियो के बाद आया है। भाई का दावा है कि अनुराग व्यूज चाहता है और झूठा केस दर्ज कराया।

Web Title : Anurag Dobhal Allegedly Assaulted Wife, Brother Reveals Shocking Chats

Web Summary : YouTuber Anurag Dobhal's brother exposed chats alleging Anurag assaulted his wife, Ritika. This follows Anurag's video accusing his parents of torture and Ritika of leaving him. The brother claims Anurag seeks views and filed a false case.