'बिग बॉस १९' मध्ये सहभागी होणार लोकप्रिय मालिकेतली 'ही' अभिनेत्री? म्हणाली, "हो मला ऑफर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 10:24 IST2025-08-13T10:23:29+5:302025-08-13T10:24:19+5:30

अभिनेत्रीला मिळाली ऑफर, पण म्हणाली...

anupama fame actress nidhi shah is approached to participate in bigg boss 19 but rejects it | 'बिग बॉस १९' मध्ये सहभागी होणार लोकप्रिय मालिकेतली 'ही' अभिनेत्री? म्हणाली, "हो मला ऑफर..."

'बिग बॉस १९' मध्ये सहभागी होणार लोकप्रिय मालिकेतली 'ही' अभिनेत्री? म्हणाली, "हो मला ऑफर..."

'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) काही दिवसात सुरु होत आहे. नेहमीप्रमाणे सलमान खान त्याच्या स्टाईलमध्ये शो होस्ट करणार आहे. यावेळी बिग बॉसमध्ये राजकारणाची थीम आहे. शोच्या प्रोमोमध्ये सलमान खानही नेत्याच्या लूकमध्ये दिसला. तसंच यंदा शोमध्ये कोण कोण सेलिब्रिटी सहभागी होणार याचीही चर्चा होत आहे. लोकप्रिय हिंदी मालिका 'अनुपमा'मध्ये सूनेच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री निधी शाहला 'बिग बॉस'ची ऑफर मिळाली आहे. तिने यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.

'बिग बॉस १९' साठी स्पर्धक फायनल करण्याची प्रक्रिया अजून सुरु आहे. मेकर्सकडून अनेक टीव्ही कलाकारांना ऑफर देण्यात आली आहे. अनुपमा मालिकेत किंजलच्या भूमिकेत दिसलेली निधी शाह आणि समरच्या भूमिकेत दिसलेला पारस कालनावत यांनाही विचारणा केली आहे. मात्र दोघांनी शोमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. इंडिया फोरमशी बोलताना निधी शाह म्हणाली, "हो मला बिग बॉससाठी अप्रोच केलं गेलं होतं. पण मी हा सीझनही करत नाहीये." तर पारस म्हणाला, "मला ऑफर मिळाली आहे. पण मी सध्या यासाठी तयार नाही."


निधी आणि पारसशिवाय इतरही काही सेलिब्रिटींना विचारणा झाली आहे. यामध्ये गौतमी कपूर, धीरज धूपर, अलिशा पंवार, खुशी दुबे, गौरव तनेजा, मिस्टर फैसू, अपूर्व मखिजा, पुरव झा, गौरव खन्ना,  धनश्री वर्मा, श्रीराम चंद्रा, अर्शिफा खान, मिकी मेकओवर, अली असगर, पूजा गौर यांचाही समावेश आहे. 

Web Title: anupama fame actress nidhi shah is approached to participate in bigg boss 19 but rejects it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.