"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 12:16 IST2025-06-26T12:15:34+5:302025-06-26T12:16:00+5:30

. 'अनुपमा' फेम अभिनेता सुधांशु पांडे याला देखील कास्टिंग काऊचचा अनुभव आला. क्रॉम्पोमाइज कर तुला रोल देतो, अशी ऑफर दिग्दर्शकाने दिल्याचा खुलासा सुधांशुने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला. 

anupama fame actor sudhanshu pandey shared casting couch experience | "कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा

"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा

सिनेइंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचे अनेक धक्कादायक प्रकार हे समोर येत असतात. केवळ अभिनेत्रीच नव्हे तर अभिनेत्यांनाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे. 'अनुपमा' फेम अभिनेता सुधांशु पांडे याला देखील कास्टिंग काऊचचा अनुभव आला. क्रॉम्पोमाइज कर तुला रोल देतो, अशी ऑफर दिग्दर्शकाने दिल्याचा खुलासा सुधांशुने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला. 

सुधांशुने गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं. तो म्हणाला, "एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने कॉम्प्रोमाइज करण्याच्या बदल्यात काम दिलं होतं. ते आता या जगात नाहीत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ते एक उत्तम दिग्दर्शक होते. कॉम्प्रोमाइज करुन मला रोलची ऑफर देण्यात आली होती. त्यांच्याबद्दल माझ्या मनात वाईट काहीच नाही. ते तुमच्यासमोर एक ऑफर ठेवतात. ते स्वीकारायचं की नाही ते तुम्ही ठरवायचं असतं. जेव्हा मला वाटतं की माझ्यासाठी हे ठीक नाही, तेव्हा मी नम्रपणे नकार देतो". 

"जर कोणी चुकीचं वर्तन केलं तर मी त्यांच्या कानाखाली मारू शकतो. कोणी मला जबरदस्तीने एखादी गोष्ट करण्यास सांगितली तर मी त्याच्यावर रागावू शकतो. हे प्रत्येकासाठी अगदीच सामान्य आहे. आणि प्रत्येकाने योग्य गोष्टींसाठी आवाज उठवला पाहिजे", असंही सुधांशु म्हणाला. दरम्यान, सुधांशूने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अनुपमा मालिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. 'सिंह इज किंग', 'दस कहानिया', 'द मिथ' अशा सिनेमांमध्येही तो झळकला आहे.   

Web Title: anupama fame actor sudhanshu pandey shared casting couch experience