अनु आणि सिद्धार्थच्या नात्यात येणार दुरावा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 19:21 IST2019-01-17T19:19:21+5:302019-01-17T19:21:15+5:30

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेला वेगळेच वळण मिळाले आहे व पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना बऱ्याच रंजक घटना बघायला मिळणार आहेत.

Anu and Siddhartha's relationship to the distraction? | अनु आणि सिद्धार्थच्या नात्यात येणार दुरावा ?

अनु आणि सिद्धार्थच्या नात्यात येणार दुरावा ?

ठळक मुद्दे'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेला मिळाले वेगळेच वळण


कलर्स मराठीवरील 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेला वेगळेच वळण मिळाले आहे. अनुची चिंता दूर झाली आहे कारण तिला आता जॉब लागला आहे. प्रणयला याबाबत कुठलीही कल्पना नाही. परंतु त्याला कुठेतरी ही शंका आहे की सिद्धार्थ ज्या कंपनीचा मालक आहे त्या कंपनीमध्येच अनुला नोकरी मिळाली आहे. अनुच्या वाईटावर असलेला प्रणय अनुला दुर्गच्या
मनातून उतरवण्यासाठी आणि दुर्गाच्या मनात अनु विषयी गैरसमज निर्माण करण्यासाठी थेट दुर्गाच्या ऑफिस मध्ये जाऊन पोहचतो. दुर्गाला तो अनुविषयी बऱ्याच वाईट गोष्टी सांगतो. इतकेच नसून यावेळेस दुर्गासमोर सिद्धार्थचे सत्य देखील येते. जेव्हा प्रणय दुर्गाला सांगतो कि, तुमचा मुलगा सिद्धार्थ आणि अनुमध्ये खूप चांगली मैत्री झाली आहे. सिद्धार्थने अनुपासून त्याची ओळख लपवली असून तो हरी बनूनच अनुला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सत्य दुर्गासमोर आल्यावर तिचा विश्वास बसत नाही. सिद्धार्थ आणि अनुमधले नाते तोडण्यासाठी दुर्गा एक कट रचते. 
तर दुर्गाला अनु अजिबात आवडत नसल्याने आणि अनुबद्दल दुर्गाच्या मनामध्ये पहिल्यापासून असलेले गैरसमज या सगळ्यामुळे त्या दोघांमध्ये असलेले मैत्रीचे नाते दुर्गाला खटकत आहे. पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना बऱ्याच रंजक घटना बघायला मिळणार आहेत. दुर्गाला हे माहिती आहे की जर तिने सिद्धार्थला अनु पासून तोडण्याचा प्रयत्न केला तर सिद्धार्थ तिच्या विरोधात जाऊ शकतो. म्हणूनच दुर्गा अनुला सिद्धार्थचे सत्य लवकरच सांगणार आहे की तो हरी नसून सिद्धार्थ म्हणजेच तिचा मुलगा आहे. अनुला हे सत्य कळल्यावर ती कुठले पाउल उचलेल ? तिला हे सत्य कळताच ती सिद्धार्थशी तिचे असलेले नाते तोडेल का ? हे 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे'च्या आगामी भागात पाहायला मिळेल.

Web Title: Anu and Siddhartha's relationship to the distraction?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.