n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">नागार्जुन-एक योद्धा या मालिकेत अंशुमन मल्होत्रा अर्जुन ही व्यक्तिरेखा साकारत आहे. अर्जुन हा एक सामान्य व्यक्ती असल्याचे तो आजपर्यंत समजत होता, तो एक नाग आहे याची त्याला कल्पनाच नव्हती. पण आता त्याला तो नाग असल्याचे कळणार आहे. आणि तो वाईट नागांशी युद्ध करण्यास सज्ज होणार आहे. या मालिकेत अनेक हाणामारीची दृश्यं चित्रीत केली जाणार आहेत. यासाठी सध्या अंशुमन ट्रेनिंग घेत आहे. तो मार्शल आटर्स आणि किकबॉक्सिंगचे धडे गिरवत आहे. महिन्याभरापूर्वी हाणामारीचे एक दृश्य चित्रीत करताना त्याच्या पायाचे हाड मोडले होते. त्यामुळे त्याने यावेळी खबरदारी घ्यायची ठरवली आहे.