अभिनेता अंकुर वाढवे दुसऱ्यांदा झाला बाबा; फोटो पोस्ट करत म्हणाला, "यावेळी मुलगा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 11:54 IST2025-10-20T11:53:51+5:302025-10-20T11:54:37+5:30
'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, सणासुदीत डबल सेलिब्रेशन!

अभिनेता अंकुर वाढवे दुसऱ्यांदा झाला बाबा; फोटो पोस्ट करत म्हणाला, "यावेळी मुलगा..."
मराठी अभिनेता अंकुर वाढवे 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून घराघरात पोहोचला होता. आपल्या खास विनोदी शैलीने त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता नुकतंच अंकुरने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. तो दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. दिवाळी सणाच्या लगबगीत अंकुरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांसोबत हा आनंद शेअर केला आहे.
अंकुर वाढवेने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने बाळाचा इटुकला हात धरला आहे. यासोबत त्याने लिहिले, 'दुसऱ्यांदा बाबा झालो... यावेळी मुलगा'. त्याच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
अंकुरने २०१९ साली कोर्ट मॅरेज केलं होतं. यवतमाळमध्ये त्याने निकिता खडसेसोबत रजिस्टर मॅरेज केलं आणि नंतर पुसद गावात त्यांचं रिसेप्शन पार पडलं होतं. २०२१ मध्ये अंकुरच्या पत्नीने मुलीला जन्म दिला होता. तर आता ४ वर्षांनी त्यांना मुलगा झाला. अंकुरचं कुटुंब पूर्ण झालं. दिवाळी सणाला त्यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झाल्याने दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
अंकुर अभिनेत्यासोबत उत्तम कवीदेखील आहे. त्याचा 'पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी' हा कवितासंग्रह आहे. त्याने करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस, आम्ही सारे फर्स्ट क्लास, सायलेन्स व कन्हैया या नाटकात काम केले आहे. तसेच जलसा चित्रपटातही त्याने काम केले आहे. मात्र चला हवा येऊ द्या या शोमधील छोटूच्या भूमिकेतून तो घराघरात पोहचला. 'अंजू उडाली भुर्रर्रर्र' या नाटकात सध्या तो दिसत आहे.