अंकिता लोखंडेने शेअर केला 'पवित्र रिश्ता'चा Video, सुशांतचे चाहते अभिनेत्रीवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 12:46 IST2023-06-01T12:44:29+5:302023-06-01T12:46:54+5:30

एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' मालिकेला नुकतीच १४ वर्षं पूर्ण झाली.

ankita lokhande shared pavitra rishta memories combined video but didnt mentioned sushantsingh rajput | अंकिता लोखंडेने शेअर केला 'पवित्र रिश्ता'चा Video, सुशांतचे चाहते अभिनेत्रीवर भडकले

अंकिता लोखंडेने शेअर केला 'पवित्र रिश्ता'चा Video, सुशांतचे चाहते अभिनेत्रीवर भडकले

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका 'पवित्र रिश्ता'मुळे अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि सुशांतसिंह राजपूत (Sushantsingh Rajput) स्टार झाले. दोघांना या मालिकेने यशाच्या शिखरावर नाऊन पोहोचवले. प्रेक्षकांनीही दोन्ही कलाकारांना प्रेम दिलं. नंतर सुशांत चित्रपटांकडे वळला आणि अंकिता-सुशांतचं खऱ्या आयुष्यातही ब्रेकअप झालं. एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' मालिकेला नुकतीच १४ वर्षं पूर्ण झाली. यानिमित्त अंकिताने एक खास व्हिडिओ शेअर केला. मात्र या व्हिडिओमुळे सुशांतचे चाहते खूपच नाराज झालेत.

'पवित्र रिश्ता' मालिकेने अंकिताला 'अर्चु' ही ओळख मिळाली. इतक्या वर्षांनंतर आजही चाहते जुने एपिसोड्स बघतात. 'पवित्र रिश्ता'च्या आठवणी ताज्या करत तिने सुंदर व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तिने साकारलेल्या 'अर्चु'या भूमिकेचे अनेक फोटो आहेत. व्हिडिओला कॅप्शन देत तिने लिहिले, " १४ वर्ष झाली पवित्र रिश्ताला पण तरी सगळं काल घडल्यासारखंच वाटत आहे. एकता कपूरची मी खूप आभारी आहे. मला अर्चना ही ओळख दिल्याबद्दल आभार. कारण ज्या लोकांना माझी भूमिका आवडली ते आजही मला भेटले की अर्च्यु असंच म्हणतात आणि मलाही ते खूप आवडतं. ज्यांनी या शोला प्रेम दिलं त्यांची मी ऋणी आहे."

अंकिताच्या व्हिडिओत सुशांतचा एकही फोटो नसून तिच्या कॅप्शनमध्येही सुशांतचा साधा उल्लेखही नाही. याच गोष्टीवर सुशांतचे चाहते अंकितावर नाराज झालेत. 'सुशांतचे पण फोटो टाकले असते तर छान वाटलं असतं', 'जर मानव म्हणजेच सुशांतला दाखवायचं नसेल तर पवित्र रिश्ताची पोस्ट करण्यात काहीच अर्थ नाहीए. कारण मानवशिवाय हा शो झिरो आहे.  सॉरी पण हे खरंय' अशा कमेंट्स अंकिताच्या या पोस्टवर आल्या आहेत. 

सुशांत आणि अंकिता अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. दोघंही लिव्हइन मध्ये राहत होते. त्यांचा लग्नाचाही प्लॅन होता. मात्र अचानक गोष्टी बिघडल्या आणि दोघांचे रस्ते वेगळे झाले. सुशांत आणि अंकिताच्या चाहत्यांना त्यांच्या ब्रेकअपमुळे खूप वाईट वाटलं होतं. नंतर जून २०२० मध्ये सुशांतच्या आत्महत्येने सर्वांनाच हादरवलं.

Web Title: ankita lokhande shared pavitra rishta memories combined video but didnt mentioned sushantsingh rajput