'आम्हाला मूल कधी होणार हे माहित नाही पण...' बेबी प्लॅनिंगबद्दल काय म्हणाली अंकिता लोखंडे?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 04:26 PM2024-05-10T16:26:25+5:302024-05-10T16:29:40+5:30

अंकिता लोखंडे गुडन्यूज कधी देणार असा प्रश्न तिला सतत विचारला जातोय.

Ankita Lokhande says she is ready to be mother talks about baby planning | 'आम्हाला मूल कधी होणार हे माहित नाही पण...' बेबी प्लॅनिंगबद्दल काय म्हणाली अंकिता लोखंडे?

'आम्हाला मूल कधी होणार हे माहित नाही पण...' बेबी प्लॅनिंगबद्दल काय म्हणाली अंकिता लोखंडे?

'बिग बॉस' मधून प्रसिद्धीझोतात आलेली अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) ही जोडी पुन्हा चर्चेत आहे. अंकिता लोखंडे गुडन्यूज कधी देणार असा प्रश्न तिला सतत विचारला जातोय. बिग बॉस 17 मध्ये येण्याआधी तिने प्रेग्नंसी टेस्ट केल्याचंही ती म्हणाली होती. नुकतंच अंकिताने आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

न्यूज 18 शोशाला दिलेल्या मुलाखतीत अंकिता लोखंडे म्हणाली, "मी आणि विकी नेहमी मुलांबद्दल बोलत असतो. ते आमचं भविष्य असणार आहेत. जेव्हा मला प्रेग्नंसीबाबत विचारलं जातं तेव्हा माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नसतं. मुलं तर होणारच आहेत कधी ना कधी. माझी आई व्हायची इच्छा आहे."

ती पुढे म्हणाली, "आम्हाला मूल कधी होणार हे माहित नाही पण आम्ही याबद्दल चर्चा नक्कीच करत असतो. मला मुलांबद्दल बोलायला खूप छान वाटतं. मी आधीच सगळं प्लॅनिंग केलं आहे. मी त्यांच्यासाठी खूप आठवणी बनवणार आहे. मी विकीला नेहमी म्हणते की जेव्हा आपण म्हातारे होऊ तेव्हा आपली मुलं आपले व्हिडिओ पाहून खूश होतील. म्हणतील की अच्छा आई बाबा आधी असे होते. आलिया भट म्हणाली होती की ती लेकीसाठी रोज ईमेल लिहिते. मलाही असंच काहीसं प्लॅनिंग करायचं आहे."

"मी विकीला आमचे जुने फोटो पाठवते आणि माझी स्मरणशक्ती जास्त आहे मला त्याच्याबद्दल प्रत्येक गोष्ट लक्षात असते. मी सगळं ईमेलमध्ये टाकणार आहे आणि माझी मुलं १८ वर्षांची होतील तेव्हा मी त्यांना पासवर्ड देईन. त्यांच्याजवळ पाहण्यासाठी खूप गोष्टी असतील", असंही ती म्हणाली.

Web Title: Ankita Lokhande says she is ready to be mother talks about baby planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.