Bigg boss 17: 'बिलासपूरला ये मग बोलू'; अंकितावर सासरे अजूनही नाराज?, फोनवरुनच सोडलं फर्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 16:53 IST2024-02-07T16:51:16+5:302024-02-07T16:53:51+5:30
Ankita lokhande: अंकिताच्या सासऱ्यांनी फोनवरुन तिला फर्मान सोडलं आहे.

Bigg boss 17: 'बिलासपूरला ये मग बोलू'; अंकितावर सासरे अजूनही नाराज?, फोनवरुनच सोडलं फर्मान
bigg boss 17 हे पर्व अभिनेत्री अंकिता लोखंडे (ankita lokhande) आणि विकी जैन (vicky jain) या जोडीमुळे जास्त चर्चेत राहिलं. सोशल मीडियावरुन कायम एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त करणारी ही जोडी बिग बॉसच्या घरात मात्र वैऱ्याप्रमाणे भांडतांना दिसले. त्यांच्या या भांडणांमध्ये दोघांच्याही कुटुंबियांनीही उडी घेतली होती. इतकंच नाही तर अंकिताच्या सासूबाईंनी तिलं बरंच सुनावलं होतं. विशेष म्हणजे हा शो संपल्यानंतरही अंकिताच्या सासरच्या मंडळींची नाराजी काही कमी झाल्याचं दिसत नाही.
अलिकडेच अंकिताने नयनदीपला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने विकीसोबतच्या भांडणांवर सासरेबुवांची प्रतिक्रिया काय होती हे सांगितलं. माझं सासऱ्यांसोबत एकदाच बोलणं झालं आहे. आता मी बिलासपूरला जाईन आणि मग त्यांची भेट घेईन. आमचं फोनवरच बोलणं झालं आहे. त्यावेळी ते माझ्यावर आणि विकीवर प्रचंड चिडले होते. पण, आता त्यांचा राग गेला आहे. आता बिलासपूरला या मग बोलू, असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे, असं अंकिता म्हणाली.
अंकितावर प्रचंड चिडले होते सासरेबुवा
बिग बॉस 17 मध्ये अंकिता ज्या पद्घतीने विकीसोबत वागत होती ते पाहून विकीचे वडील चांगलेच चिडले होते. इतकंच नाही तर अंकिताने विकीला मारलेल्या चप्पलवरुन त्यांनी अंकिताच्य आईलादेखील सुनावलं होतं.