अंकिता लोखंडे खरंच प्रेग्नंट? Laughter Chef चा प्रोमो व्हायरल; अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 16:55 IST2024-10-03T16:54:02+5:302024-10-03T16:55:27+5:30

'लाफ्टर शेफ' मधील सर्व सेलिब्रिटी विकी आणि अंकिताचं अभिनंदन करत आहेत.

Ankita Lokhande really pregnant or not watch latest promo of laughter chef | अंकिता लोखंडे खरंच प्रेग्नंट? Laughter Chef चा प्रोमो व्हायरल; अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा

अंकिता लोखंडे खरंच प्रेग्नंट? Laughter Chef चा प्रोमो व्हायरल; अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा

कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय शो 'लाफ्टर शेफ' (Lauaghter Chef) आता निरोप घेत आहे. शोचे शेवटचे काही एपिसोड्स राहिले आहेत. या शोमध्ये अनेक टीव्ही सेलिब्रिटी सहभागी झाले. करण कुंद्रा, अंकिता लोखंडे, विकी जैन, कृष्णा अभिषेक, कश्मिरा शाह, जन्नत जुबैर, रीम शेख, निया शर्मा, अली गोनी, राहुल वैद्य सोबत काही कलाकार होते. सर्वांना एक डिश बनवायचा टास्क असायचा. कोणीही परफेक्ट स्वयंपाक करणारं नसल्याने खूप मजा यायची. सर्वांनीच प्रेक्षकांना खळखळून हसवलं. सध्या लाफ्टर शेफचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये सर्वजण अंकिताचं अभिनंदन करत आहेत.

'लाफ्टर शेफ' मधअये स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस ओटीटीचा विजेता मुनव्वर फारुकीने हजेरी लावली. व्हिडिओमध्ये अंकिता तिच्या पायात क्रॅम्प आल्याचं सांगत आहे. हे ऐकून मुनव्वर म्हणतो, गुडन्यूज आहे वाटतं. तर अली गोनीही मजेत म्हणतो अंकिताचे पाय काही दिवसांपासून जड पडले आहेत. हे ऐकून सर्वजण अंकिताला हसत हसत अभिनंदन म्हणतात आणि तिच्याभोवती नाचायला लागतात. विकी अंकिताच्या कपाळावर किस करतो. तर कृष्णाही विकीला चिडवतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.


व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत शो संपत असल्याने नाराजी दर्शवली आहे. अनेक चाहते भावूक झाले आहेत. शोचे शेवटचे काही एपिसोड्स राहिले आहेत. दुसरीकडे अंकिताची ही गुडन्यूज खरी आहे का तर आता अभिनेत्रीकडूनच कळेल. 

 

 

Web Title: Ankita Lokhande really pregnant or not watch latest promo of laughter chef