BB17 मध्ये अंकिता लोखंडे ठरणार सगळ्यात महागडी स्पर्धक ?, गेल्या सीझनचाही मोडणार रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 18:46 IST2023-10-05T17:50:29+5:302023-10-05T18:46:34+5:30
अकिंताने या शोमध्ये जाण्यासाठी सगळी प्लॅनिंग केली असून सध्या ती कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची तयारी करत आहे.

BB17 मध्ये अंकिता लोखंडे ठरणार सगळ्यात महागडी स्पर्धक ?, गेल्या सीझनचाही मोडणार रेकॉर्ड
टीव्हीवरचा सर्वात चर्चेतला आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा 17 (Bigg Boss 17) वा सिझन लवकरच सुरु होत आहे. यंदाच्या सिझनचंही सूत्रसंचालन दबंग अभिनेता सलमान खानच (Salman Khan) करणार आहे. काही दिवसांपूर्वीच नवीन सिझनचा प्रोमो रिलीज झाला. अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन हे कपल या सिझनमध्ये सहभागी होणार यावर शिक्कामोर्तब झालंय.
15 ऑक्टोबरपासून 'बिग बॉस 17' भेटीला येत आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता आणि शनिवार रविवार रात्री ९ वाजता शो टेलिकास्ट होणार आहे. हा सिझन सिंगल विरुद्ध कपल असा असणार आहे. अकिंताने या शोमध्ये जाण्यासाठी सगळी प्लॅनिंग केली असून सध्या ते कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची तयारी करत आहेत. इतकंच नाही तर रिपोर्टनुसार, विकी आणि अंकिता तब्बल २०० आऊटफिट आपल्या सोबत घेऊन जाणार आहेत.
या शोमध्ये सहभागी होण्यासाठी निर्माते अनेक टीव्ही सेलिब्रिटींशी संपर्क साधला. लेटेस्ट रिपोर्टनुसार, अंकिता लोखंडे BB 17 ची सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक बनून रेकॉर्ड तोडू शकते. गेल्या वर्षी म्हणजेच बिग बॉस 16 मध्ये सुंबूल तौकीर खान ही सर्वाधिक मनाधन घेणारी स्पर्धक ठरली होती. मात्र आता अंकिता लोखंडे सुंबुलचा रेकॉर्डही मोडण्याची शक्यता आहे.
अंकिता हे टीव्ही इंडस्ट्रीतील खूप लोकप्रिय नाव आहे, तिची लोकप्रियता लक्षात घेता तिला दर आठवड्याला 10 ते 12 लाख रुपयांपेक्षा जास्त पॅकेज मिळू शकते असा अंदाज आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही.