पायाला दुखापत पण सासूबाईंसोबत भन्नाट नाचली Ankita Lokhande, सासू-सुनेच्या जोडीचा डान्स व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 12:58 IST2021-12-15T12:53:47+5:302021-12-15T12:58:17+5:30

अंकिता लोखंडे (Ankita Lohhande) च्या पायाला दुखापत झाली होती. डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला देखील दिला होता.

Ankita lokhande dance with mother in law in sangeet ceremony | पायाला दुखापत पण सासूबाईंसोबत भन्नाट नाचली Ankita Lokhande, सासू-सुनेच्या जोडीचा डान्स व्हिडीओ व्हायरल

पायाला दुखापत पण सासूबाईंसोबत भन्नाट नाचली Ankita Lokhande, सासू-सुनेच्या जोडीचा डान्स व्हिडीओ व्हायरल

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे  (Ankita Lohhande)  आता मिसेस जैन झाली आहे. अंकिताने मुंबईत बॉयफ्रेंड विकी जैन (Vicky Jain) सोबत सात फेरे घेतले. गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसत होती. अग्नीच्या साक्षीने अंकिता व विकी एकमेकांचे झालेत. हा आनंद लपता लपत नव्हता. अंकिताच्या चेह-यावरचा आनंद तर बघण्यासारखा होता.सध्या दोघांच्या लग्नातील फोटो आणि व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. अंकिताच्या मेहंदी सेरेमनीपासून ते लग्नापर्यंतचे सगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले. 

लग्नाला काही दिवस उरले असताना अंकिता लोखंडेच्या पायाला दुखापत झाली होती. डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला देखील दिला होता. मात्र अंकिता तिच्या संगीत सेरेमनीमध्ये पायाच्या दुखापत विसरुन जोरादर डान्स करताना दिसली, संगीत सेरेमनीला कंगना राणौतपासून अमृता खानविलकरपर्यंत सगळ्यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे अंकिताने तिच्या सासूबाईंसोबत सुंदर डान्स केला. सासू-सुनेच्या जोडीने स्टेजवर जबरदस्त डान्स केला. 


अंकिता लोखंडे आणि विक्की जैन जवळपास साडे तीन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत.विकी जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे.
 

Web Title: Ankita lokhande dance with mother in law in sangeet ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.