VIDEO : “तो माझं सर्व काही होता...”, सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत अंकिता लोखंडेला कोसळलं रडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 10:58 IST2022-09-02T10:58:13+5:302022-09-02T10:58:45+5:30

Ankita Lokhande-Sushant Singh Rajput:  उषा नाडकर्णी यांना देखील अश्रू अनावर, पाहा ‘डीआयडी सुपर मॉम’च्या मंचावरचा इमोशनल व्हिडीओ

Ankita Lokhande breaks down ON DID Super Moms tribute to Sushant Singh Rajput | VIDEO : “तो माझं सर्व काही होता...”, सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत अंकिता लोखंडेला कोसळलं रडू

VIDEO : “तो माझं सर्व काही होता...”, सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत अंकिता लोखंडेला कोसळलं रडू

सुशांत सिंग राजपूत( Sushant Singh Rajput)  या जगातून गेला, पण आजही त्याचे चाहते या दु:खातून सावरू शकलेले नाहीत. ‘डीआयडी सुपर मॉम’च्या (DID Super Moms) मंचावर पुन्हा एकदा सुशांत सिंग राजपूतच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आणि या शोमध्ये स्पेशल गेस्ट म्हणून पोहोचलेल्या अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande) अश्रू अनावर झालेत.
 या शोचा एक प्रोमो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता प्रचंड इमोशनल झालेली दिसून येत आहे. ‘डीआयडी सुपर मॉम’च्या आगामी भागात, दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत एक परफॉर्मन्स सादर करण्यात आला. हा परफॉर्मन्स पाहून अंकिताच्या अश्रूंचा बांध फुटला.

या शोमध्ये अंकितासोबत ‘पवित्र रिश्ता’मधील सहकलाकार आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी देखील उपस्थित होत्या. त्या सुद्धा सुशांतच्या आठवणीत भावुक झाल्यात.  स्पर्धकाचा परफॉर्मन्स पाहून अंकिता आणि उषा नाडकर्णी या दोघीनांही अश्रू अनावर झाले. 

अंकिता लोखंडेने सुशांतसोबत ‘पवित्र रिश्ता’मधून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. अंकिता आणि सुशांतची केमिस्ट्रीसुद्धा लोकांना आवडली होती. याच मालिकेच्या सेटवर अंकिता व सुशांत दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते.  सुशांतने एका डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये अंकिताला प्रपोजही केलं होतं. पुढे सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अचानक  सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अंकिता व सुशांत दोघांचं ब्रेकअप झालं. आज सुशांत या जगात नाही. पण त्याच्याबद्दल अंकिताच्या मनात अपार आदर आहे. कदाचित याचमुळे सुशांतच्या आठवणीत अंकिता भावुक झाली. 

‘तो खूप जवळचा मित्र होता... तो माझं सर्वकाही होता.. आणि तो जिथे कुठे आहे तिथे खूप आनंदी राहू दे. देव त्याला आशीर्वाद देवो,’असं ती यावेळी म्हणाली.  हा प्रोमो सोशल मीडियावर येताच सुशांतचे चाहते भावुक आले आहेत. सुशांत सिंग राजपूत 14 जून रोजी त्याच्या मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. अभिनेत्याने राहत्या घरी गळफास घेत कथितरित्या आत्महत्या केली होती.  

Web Title: Ankita Lokhande breaks down ON DID Super Moms tribute to Sushant Singh Rajput