अंकित गेरा आणि युक्ती कपूर दिसले संजय दत्त आणि नगमाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2017 14:46 IST2017-07-22T09:16:01+5:302017-07-22T14:46:01+5:30
अंकित गेरा आणि युक्ती कपूर सध्या अग्निफेरा या मालिकेत अनुराग आणि रागिणी या भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील एका ...

अंकित गेरा आणि युक्ती कपूर दिसले संजय दत्त आणि नगमाच्या भूमिकेत
अ कित गेरा आणि युक्ती कपूर सध्या अग्निफेरा या मालिकेत अनुराग आणि रागिणी या भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील एका दृश्यात त्यांची खूप चांगली केमिस्ट्री दिसून आली. 90च्या दशकातील यलगार या चित्रपटामधील आखिर तुम्हे आना है हे गाणे संजय दत्त आणि नगमावर चित्रीत करण्यात आले होते. हे गाणे खूप गाजले होते. हेच गाणे नुकतेच अंकित आणि युक्तीवर चित्रीत करण्यात आले. यावेळी अंकित आणि युक्तीमध्ये खूप चांगली केमिस्ट्री पाहायला मिळाली. या गाण्याचे चित्रीकरण करणे अंकित आणि युक्तीसाठी खूपच कठीण होते. कारण चित्रीकरण मध्यरात्री करण्यात आले होते. त्यावेळी खूपच थंडी होती. तसेच या दृश्यात पाऊस पडतोय असेही दाखवायचे होते. अंकित आणि युक्तीच्या अंगावर सतत पाणी पडत असल्याने थंडीने ते कुडकुडत होते. पण तरीही त्यांनी या गाण्याचे चित्रीकरण पूर्ण केले. त्या दोघांनीही या गाण्याच्या चित्रीकरणासाठी अजिबातच ब्रेक घेतला नाही. कारण ब्रेक घेतल्यास आपल्याला अधिक थंडी वाजेल असे त्यांना वाटत होते. याविषयी अंकित सांगतो, हे गाणे मला खूप आवडते. त्यामुळे मी अनेक वेळा गितार वाजवताना हे गाणे गुणगुणतो. पण या गाण्याचे चित्रीकरण करणे आमच्यासाठी आव्हानात्मक होते. पण तरीही आम्ही हे चित्रीकरण खूप चांगल्या प्रकारे केले तर रागिणीची भूमिका साकारणारी युक्ती सांगते, पावसामध्ये एखादे गाणे चित्रीत करावे अशी माझी अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. त्यामुळे मी या चित्रीकरणासाठी खूपच उत्सुक होते. तसेच या गाण्यात मी लाल रंगाची शिफॉनची साडी घातली आहे. लाल रंग मला खूप आवडत असल्याने मला या गाण्यातील माझा लूकदेखील खूप आवडला.
Also Read : 'अग्निफेरा' मालिकेतून दोन दबंग वधू करतायेत छोट्या पडद्यावर एंट्री
Also Read : 'अग्निफेरा' मालिकेतून दोन दबंग वधू करतायेत छोट्या पडद्यावर एंट्री