आई झाल्यानंतर अभिनेत्रीने चार वर्षांनी केलं कमबॅक, किसींग सीनला दिला नकार; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 15:42 IST2025-08-12T15:40:25+5:302025-08-12T15:42:03+5:30
अभिनेत्री म्हणाली, "माझ्या नवऱ्याला अडचण नाही पण..."

आई झाल्यानंतर अभिनेत्रीने चार वर्षांनी केलं कमबॅक, किसींग सीनला दिला नकार; म्हणाली...
'ये है मोहोब्बते' मालिकेत दिसलेली अभिनेत्री अनिता हसनंदानी (Anita Hassanandani) सध्या 'छोरियां चली गांव' या रिएलिटी शोमध्ये दिसत आहे. अनिता बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. 'ताल','क्रिश्ना कॉटेज' या सिनेमांमध्येही ती दिसली आहे. २०२१ मध्ये तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचं नाव आरव आहे. तर अनिताचा नवरा रोहित रेड्डी बिझनेसमन आहे. दोघांची जोडी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. लेकाच्या जन्मानंतर चार वर्षांनी अनिताने कमबॅक केलं आहे. नुकतंच तिने कॅमेऱ्यासमोर किसींग सीन देण्यास नकार दिला.
अनिता हसनंदानी इन्संट बॉलिवूडशी बोलताना म्हणाली, "मी कॅमेऱ्यासमोर किसींग सीन देण्यास अजिबात कंफर्टेबल नाही. हे ऐकून अनेकांना वाटेल की मला माझ्या नवऱ्यानेच यासाठी परवानगी दिली नसेल. पण असं नाहीये. मी हे स्पष्ट करु इच्छिते की माझा नवरा एकदम कूल, सुपरचिल आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आई झाल्यानंतर मला एका प्रोजेक्टमध्ये लव्ह मेकिंग सीन ऑफर झाला होता. हा सीन एकदम ग्रेसफुली शूट केला जाईल असंही ते मला म्हणाले होते. मात्र त्यात किसींग सीनही होता. यावर माझा नवरा म्हणाला की तू जर कंफर्टेबल असशील तर करु शकतेस. रोहितला काहीच अडचण नव्हती."
ती पुढे म्हणाली, "पण मीच असा विचार केला की जे मी इतक्या वर्षात कधी केलं नाही ते मी आता तरी का करु? मी यात कंफर्टेबल नाही. माझ्या नवऱ्याला माझ्या लव्हमेकिंग सीनमुळे काहीही अडचण नव्हती. पण मी स्वत:च कंफर्टेबल नसल्याने मी नकार दिला होता."
आई झाल्यानंतर अनिता आता पुन्हा कामावर परतली आहे. 'सुमन इंदोरी' या मालिकेत ती झळकत आहे. अनिता बिग बॉसमध्येही सहभागी होणार अशी चर्चा होती मात्र तिने या अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.