थाटामाटात पार पडलं अनिता हसनंदानीचे डोहाळे जेवण, एकता कपूरने दिली बेबी शॉवरची शानदार पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 14:24 IST2020-12-21T14:06:59+5:302020-12-21T14:24:05+5:30
टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी लवकरच लवकरच आई होणार आहे.

थाटामाटात पार पडलं अनिता हसनंदानीचे डोहाळे जेवण, एकता कपूरने दिली बेबी शॉवरची शानदार पार्टी
टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी लवकरच लवकरच आई होणार आहे. रविवारी रात्री एकता कपूरने तिची जवळची मैत्रिणी अनिता हसनंदानीसाठी बेबी शॉवरची पार्टी ठेवली होती. या पार्टीच्या अनेक सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. ज्यात अनिता हसनंदानीच्या चेहऱ्यावर आई होणाचा आनंद स्पष्टपणे दिसत आहे.
एकता कपूरने अनितासाठी तिच्या घरी एक मस्त पार्टी ठेवली होती. . सोशल मीडियावर दिसत असलेल्या व्हिडिओमध्ये टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित अनेक अभिनेत्रीच्या या पार्टीत सामील झाल्याचे पाहायला मिळाले.
अनिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या सगळ्या अपडेट ती चाहत्यांसह शेअर करत असते. अनिताने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आणि स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. 'कभी सौतन, कभी सहेली', 'ये हैं मोहब्बते', 'नागीन 3' या मालिकेतील तिच्या भूमिका प्रचंड गाजल्यात. 2013 मध्ये अनिताने रोहित रेड्डीसोबत लग्नगाठ बांधली होती. विशेष म्हणजे लग्नाच्या सात वर्षानंतर या कपलच्या आयुष्यात बाळाची एंट्री होणार आहे. बाळाच्या येण्याची चाहुल लागल्यापासून दोघेही आतुरतेने बाळाच्या आगमनाची वाट पाहात आहेत. अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डीचा प्रेमविवाह होता.अनिता आणि रोहित रेड्डी दोघांची पहिली भेट जीममध्ये झाली होती.