चर्च वेडिंगसाठी असे तयार झाले होते अनिता आणि अंगुरी भाभी,शूटिंग दरम्यान असो होता सा-यांचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 16:51 IST2018-03-06T11:21:44+5:302018-03-06T16:51:44+5:30
‘भाभीजी घर पर है’च्या टीमने नुकताच गोव्यात एक खास एपिसोड शूट केला आणि या एपिसोडमध्येही टीम समुद्रकिनाऱ्यावर धमाल करताना ...

चर्च वेडिंगसाठी असे तयार झाले होते अनिता आणि अंगुरी भाभी,शूटिंग दरम्यान असो होता सा-यांचा अंदाज
‘ ाभीजी घर पर है’च्या टीमने नुकताच गोव्यात एक खास एपिसोड शूट केला आणि या एपिसोडमध्येही टीम समुद्रकिनाऱ्यावर धमाल करताना दिसेल.निर्मात्यांनी मालिकेला अधिक रंजक वळण देत दोन्ही जोडप्यांना (अनिता आणि विभुती, आणि अंगूरी आणि तिवारी) खास ख्रिश्चन पद्धतीने विवाहबंधनात अडकणा असा ट्रॅक शूट केला आहे.लग्न गोव्यात होणार असल्यामुळे त्यानुसार सगळ्या गोष्टी प्लॅन करण्यात आले होते.कथेतल्या वळणाप्रमाणे दोन्ही कपल पुन्हा एकदा लग्न करण्यासाठी गोव्यात पोहोचतात. गोवा म्हटल्यावर साग्रसंगीत चर्च वेडिंग आलेच, आणि त्यासाठी वधू पांढऱ्याशुभ्र गाऊनमध्ये आणि वर रुबाबदार काळ्या सूट्समध्ये असणार हे ओघानेच आले.अंगूरीभाभींची भूमिका करणाऱ्या शुभांगी अत्रे म्हणाली “चर्च वेडिंगच्या कल्पनेनेच मी इतकी उत्सुक झाले की विचारू नका. इतक्या नवनवीन कल्पना घेऊन येणाऱ्या आमच्या निर्मात्यांचे कौतुक करावे तितके थोडेच.यामुळे आमच्या कामामध्ये नाविन्य असल्यामुळे आम्ही कायम उत्साही राहतो.साचेपद्धतीच्या कामात न अडकता अशाप्रकारे वेगवेगळ्या स्वरूपात रसिकांचे मनोरंजन करायला मिळाल्यामुळे काम अधिक एन्जॉय करत असल्याचे शुभांगी अत्रे सांगते.
![]()
मनमोहन तिवारींच्या भूमिकेत असणारा रोहीताश गौड म्हणाला “एखाद्या खास,हटके अशा प्रसंगाची आम्ही वाटच बघत होतो.आणि गोवा प्रवासाची संधी नेमक्या वेळी चालून आली.सेटपासून लांब अशा ठिकाणी जाऊन आऊट डोअर शूट करताना आम्हाला एक वेगळे वातावरण,खूप रिफ्रेश झालो.अशा कामांमुळे दैनंदिन चौकटीतून बाहेर पडता येते.गोव्यात आम्ही खूप मजा केली.चर्च वेडिंग म्हणजे महिलांसाठी नटण्याथटण्याची पर्वणीच.त्यांनी त्यांच्या वेशभूषेवर आणि रंगभूशेवर विशेष मेहनत घेतली आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसेलच.विभूतीनारायण मिश्रा या भूमिकेत दिसणारे असिफ शेख म्हणाला,'भाभीजी’चाआगामी एपिसोड आम्हा सगळ्यांसाठी बऱ्याच कारणांसाठी खास आहे.एक अत्यंत सुंदर चर्च या एपिसोडसाठी निवडले होते आणि त्यामुळे आम्हा सर्वांचा मूडही मस्त बनला होता.”असिफ पुढे हसत हसत म्हणाले“या एपिसोडसाठी मी जेम्स बाँडसारखा दिसणार आहे असे मी आधीच जाहीर केले होते आणि आमच्या वेशभूषा,रंगभूषा टीमने मला मुळीच निराश केले नाही.आम्हाला जेवढी मजा आली तेवढीच रसिकांनाही येणार आहे.
![]()
अनिताभाभींच्या भूमिकेत असलेली सौम्य टंडन म्हणाली “एक ख्रिश्चन वधू म्हणून चर्चमध्ये मिरवण्याची ही माझी पहिलीच वेळ होती.पांढरा गाऊन बरेचदा घातला होता पण अशाप्रकारे वेडिंग गाऊन घालण्याचा अनुभव खासच होता.मला व्यवस्थित बसणारा आणि शोभणारा पांढराशुभ्र गाऊन शोधण्यासाठी मी खूप धावपळ केली.एक तर मला पांढरे गाऊन फारसे आवडत नाहीत आणि कमरेखाली फुगेदार असलेला गाऊन शरीरयष्टीनुसार फिट होणे कठीण असते.त्यामुळे माझी फिगर नीट उठून दिसेल असाच गाऊन मी निवडला.मी निवडलेला बिनबाह्यांचा, भरपूर पायघोळ असलेला आणि सुंदर झिरझिरीत असलेला गाऊन मला कूप सुट होत होता.तसेच फ्रेंच बनमध्ये बसवलेले केस, हलकासा मेकप आणि थोडी लिपस्टिक इतकीच वेशभूषा मी केली होती. एक सुंदर लूक येण्यासाठी मी साधे फुलपाखराच्या आकाराचे डायमंड पेंडंट आणि इयरिंग्ज घातले होते.या सगळ्या पेहेरावात त्या सुंदर चर्चमध्ये एक ख्रिश्चन वधू म्हणून वावरण्यात एक वेगळीच मजा आली.हा लूक माझ्या सगळ्यात आवडत्या लुक्सपैकी एक ठरला.तर मंडळी अशा तऱ्हेने आपली ही दोन्ही जोडपी नटूनथटून चर्चवेडिंगसाठी तयार तर झालीत.पण‘आय डू’ म्हणण्याची संधी त्यांना मिळणार आहे का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.