​आणि नृत्य सादर करताना दयाचा पायझमा फाटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 16:38 IST2017-07-13T11:08:16+5:302017-07-13T16:38:16+5:30

दयानंद शेट्टी हा प्रेक्षकांना दया याच नावाने चांगला माहीत आहे. सीआयडी या मालिकेतील दरवाजा तोडणारा दया तर प्रेक्षकांचा प्रचंड ...

And the pessimism of mercy while dancing was torn apart | ​आणि नृत्य सादर करताना दयाचा पायझमा फाटला

​आणि नृत्य सादर करताना दयाचा पायझमा फाटला

ानंद शेट्टी हा प्रेक्षकांना दया याच नावाने चांगला माहीत आहे. सीआयडी या मालिकेतील दरवाजा तोडणारा दया तर प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण त्याचे फॅन आहेत. सीआयडी या मालिकेत तो जवळजवळ 18 वर्षांपासून काम करत आहे. याचदरम्यान दयाने गुटर गूँ, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकांमध्ये काम केले होते. या मालिकांमध्ये त्याचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. आता दया प्रेक्षकांना एका नव्या रूपात दिसणार आहे. दया आता डान्सर म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दया गोल्ड अवॉर्ड पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स सादर करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दया एका पुरस्कार सोहळ्यात वंदे मातरम या गाण्यावर नृत्य सादर करणार आहे. हा त्याचा परफॉर्मन्स नुकताच चित्रीत करण्यात आला. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच हा परफॉर्मन्स प्रचंड आवडला. पण या परफॉर्मन्सच्या दरम्यान एक गंमत घडली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या लक्षातच आले नाही की नृत्य करताना दयाचा पायझमा फाटला. गाण्याची सुरुवात झाल्यानंतर लगेचच एक स्टेपमध्ये त्याला त्याचा पाय जोरदार आपटायचा होता. पण त्याचवेळी त्याचा पायझमा फाटला. पण तरीही त्याने आपले नृत्य थांबवले नाही. याविषयी दया सांगतो, पुरस्कार सोहळ्याच्या आदल्या दिवशी मी कपड्यांच्या फिटिंगसाठी गेलो असता मला पायझमा काही ठिकाणी खूप घट्ट होत असल्याचे मी त्यांना सांगितले होते. पण तरीही त्यांनी व्यवस्थित फिटिंग केली नाही. ही गोष्ट मला पऱफॉर्मन्स सादर करायच्या काही मिनिटे अगोदरच लक्षात आली. त्यामुळे तसेच कपडे घालण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. मी नृत्याची पहिलीच स्टेप करताच माझा पायजमा फाटला. त्यामुळे माझ्याकडे परफॉर्मन्स सादर करत राहाण्याशिवाय पर्याय नव्हता. 

Also Read : सीआयडी फेम जान्हवी छेडा लवकरच होणार आई

Web Title: And the pessimism of mercy while dancing was torn apart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.