...आणि कुशलचा हात भाजला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 16:58 IST2016-09-19T11:28:37+5:302016-09-19T16:58:56+5:30
आपल्या हिरोईनला वाचवण्यासाठी हिरो आपल्या जीवाची बाजी लावतो हे आपण अनेकवेळा चित्रपटांमध्ये पाहिले आहे. पण मालिकांच्या सेटवर अशा गोष्टी घडताना ...
.jpg)
...आणि कुशलचा हात भाजला
आ ल्या हिरोईनला वाचवण्यासाठी हिरो आपल्या जीवाची बाजी लावतो हे आपण अनेकवेळा चित्रपटांमध्ये पाहिले आहे. पण मालिकांच्या सेटवर अशा गोष्टी घडताना आपल्याला खूपच कमी वेळा ऐकायला मिळतात. बेहद ही जेनिफर विंगेट आणि कुशल टंडनची मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना कुशलचा हात भाजला. कुशलची सहकलाकार अनेरी वंजारीच्या अंगावर गरम कॉफी पडत होती. त्यामुळे कुशलने कॉफी स्वतःच्या हातावर झेलली आणि त्यामुळे त्याचा हात भाजला. याविषयी अनेरी सांगते, "एका दृश्यात चित्रीकरणाच्यावेळी कॉफीचा कप माझ्या हातात होता. पण कसलातरी धक्का लागल्याने कॉफी माझ्या अंगावर पडत होती. त्यामुळे कुशलने ती त्याच्या हातावर झेलली. कॉफी इतकी गरम होती की, त्याच्या हातावर मोठे फोड आले. त्याला माझ्यामुळे खूप त्रास झाला आहे. त्यामुळे त्याचा हात लवकरच बरा होऊदे अशी माझी इच्छा आहे."