'एक नंबर तुझी कंबर...' व्हायरल गाण्यावर थिरकली अनघा अतुल, साडी नेसून केला डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 11:31 IST2025-05-26T11:30:45+5:302025-05-26T11:31:34+5:30
अभिनेत्री अनघा अतुल हिने 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. अनघाने साडी नेसून 'एक नंबर तुझी कंबर'च्या हुक स्टेप्स केल्या आहेत.

'एक नंबर तुझी कंबर...' व्हायरल गाण्यावर थिरकली अनघा अतुल, साडी नेसून केला डान्स
सोशल मीडियावर गाण्यांचा ट्रेंड रोज बदलत असतो. रोज नवी गाणी सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात. संजू राठोडच्या 'गुलाबी साडी'ने सोशल मीडिया दणाणून सोडलं होतं. 'गुलाबी साडी'नंतर संजू राठोडच्या आणखी एका गाण्याने सोशल मीडियाला भुरळ पाडली आहे. 'एक नंबर तुझी कंबर' हे गाणं सध्या इन्स्टावर ट्रेंडिंग आहे. या गाण्यावरील अनेक रील्स व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनाही या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरता येत नाहीये.
आता अभिनेत्री अनघा अतुल हिने 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. अनघाने साडी नेसून 'एक नंबर तुझी कंबर'च्या हुक स्टेप्स केल्या आहेत. इन्स्टाग्रामवरुन अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. अनघाच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. अनघाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अनघा अतुल हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'रंग माझा वेगळा' मालिकेमुळे अनघला प्रसिद्धी मिळाली. काही नाटकांमध्येही ती दिसली. सध्या अनघा शिकायला गेलो एक नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अनेक जाहिरातींमध्येही अनघा झळकली आहे.