'सावळ्याची जणू सावली' मालिकेत रंजक वळण, सारंग सावलीसाठी तिल्लोत्तमावर चढवणार आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 14:51 IST2025-01-25T14:50:10+5:302025-01-25T14:51:27+5:30
Savalyanchi Janu Savali : 'सावळ्याची जणू सावली' मालिका एक मनोरंजनक वळणावर आली आहे. सावली आणि सारंगचे नातं बदलताना दिसत आहे.

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत रंजक वळण, सारंग सावलीसाठी तिल्लोत्तमावर चढवणार आवाज
'सावळ्याची जणू सावली' मालिका ( Savalyanchi Janu Savali Serial) एक मनोरंजनक वळणावर आली आहे. सावली आणि सारंगचे नातं बदलताना दिसत आहे. सावलीच्या सहगायिका म्हणून काम करण्याबाबत मत घेण्यात येते आणि सारंगचं सावलीच्या बाजूने असलेले मत निर्णायक ठरते. त्यामुळे तिलोत्तमाचा राग अनावर होणार आहे. तर सारंग आईला समजावण्याचा प्रयत्न करतो.
सारंग सावलीची माफी मागण्यासाठी धडपडतोय. दरम्यान, हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाच्या तयारीला सुरुवात झाली, पण कुटुंबीयांमध्ये तणाव आहे. सारंग सावलीला एका कॅफेमध्ये नेऊन माफी मागण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तिलोत्तमाला हे समजल्यावर ती कॅफेमध्ये जाऊन वाद घालते. ती सावलीला सारंगच्या आयुष्यातून कायमची निघून जाण्यासाठी कोऱ्या चेकचा प्रस्ताव देते. यावेळी सारंग प्रथमच आईवर आवाज चढवणार आहे.
काय आहे देवा आणि सावलीच कनेक्शन?
मकरसंक्रांतीच्या दिवशी, जगन्नाथ सावलीच्या घरी एका वाईट हेतूने भेट देतो. ज्यामुळे त्याचा आणि सारंगचा मोठा वाद होणार आहे. कुटुंबातील तणाव तेव्हा वाढतो, जेव्हा जयंती आणि सखा सावलीसाठी भेटवस्तू घेऊन येतात. जयंती ठामपणे सांगते की सावलीने सारंगच्या खोलीत राहावे. इकडे सारंग सावलीची मनापासून माफी मागतो आणि तिचा विश्वास जिंकतो. त्यानंतर, देवा आणि सावली यांची पहिली भेट होणार आहे. पण त्यांच्यात तात्काळ एक विशेष नाते निर्माण होते. बोलता बोलता देवाला सावली आपली लहान बहीण असल्यासारखी वाटू लागते, तर सावलीला देवामध्ये एक उबदार आपलेपण जाणवते. त्या दोघांमध्ये अगदी क्षणात गोड संवाद तयार होतो, जणू नशिबानेच त्यांना एकमेकांसाठी जोडून ठेवले होते. काय आहे देवा आणि सावलीच कनेक्शन? जयंती आणखी काय गोंधळ घालणार ? हे पाहावे लागेल.