अमृता पडली मराठी जेवणाच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 15:27 IST2016-06-27T09:57:22+5:302016-06-27T15:27:22+5:30
अमृता राव सध्या मेरी आवाजही पहचान है या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत पल्लवी जोशीही महत्त्वाच्या भूमिकेत ...
.jpg)
अमृता पडली मराठी जेवणाच्या प्रेमात
अ ृता राव सध्या मेरी आवाजही पहचान है या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत पल्लवी जोशीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रीकरणादरम्यान पल्लवी आणि अमृताची चांगलीच गट्टी जमली आहे. पल्लवी सेटवरचे जेवण न जेवता नेहमी घरून जेवणाचा डबा घेऊन येते आणि तिच्या जेवणावर टिममधील सगळ्यांचीच नजर असते. टिममधील सगळेच तिच्या जेवणावर अक्षरशःताव मारतात. अमृताला तर पल्लवीच्या घरचे जेवण खूपच आवडते. पल्लवीच्या घरच्या जेवणामुळे ती महाराष्ट्रीयन जेवणाच्या प्रेमातच पडली आहे असे ती सांगते.