अमिताभ बच्चन नव्हे रणबीर कपूर करणार कौन बनेगा करो़डपतीचे सूत्रसंचालन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 10:59 IST2017-01-23T05:29:05+5:302017-01-23T10:59:05+5:30
देवी और सज्जनो म्हणत अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाला सुरुवात करत असत. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाद्वारे ...

अमिताभ बच्चन नव्हे रणबीर कपूर करणार कौन बनेगा करो़डपतीचे सूत्रसंचालन?
द वी और सज्जनो म्हणत अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाला सुरुवात करत असत. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाद्वारे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी छोट्या पडद्यावर एंट्री मारली. याआधी त्यांचे लाल बादशाह, सूर्यवंशम हे सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले होते. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचे करियर आता संपले अशी चर्चा सुरू असतानाच कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाने क्षणार्धात सगळ्या गोष्टी बदलल्या.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमामुळे अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावरचेदेखील महानायक बनले. त्यांच्या आवाजाचे प्रेक्षक अक्षरशः वेडे झाले होते. त्यांचे लोकांशी अतिशय प्रेमाने बोलणे, त्यांना आदराने वागवणे या गोष्टींमुळे त्यांच्या फॅन फॉलॉविंगमध्ये प्रचंड वाढ झाली. पण या कार्यक्रमाच्या काही सिझननंतर अमिताभ बच्चन यांनी हा कार्यक्रम सोडला आणि त्याच्यानंतर या कार्य़क्रमाचे सूत्रसंचालन शाहरुख खानने केले. पण बॉलिवूडच्या बादशहाला लोकांचे अमिताभ बच्चन यांच्याइतके प्रेम मिळवता आले नाही.
![kaun banega crorepati amitabh bachchan]()
आता या कार्यक्रमाचा पुढचा सिझन लवकरच येणार असून या वेळी कौन बनेगा करोडपतीच्या होस्टच्या रूपात प्रेक्षकांना एक नवा चेहरा पाहायला मिळणार आहे.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आता रणबीर कपूर करणार असल्याची चर्चा आहे. आतापर्यंत रणबीर कपूरने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी रणबीर छोट्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याची सध्या प्रचंड चर्चा आहे.
रणबीर आता काहीच दिवसांत जग्गा जासूस या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करणार आहे. त्यानंतर तो संजय दत्तच्या आयुष्यावर बनवण्यात येणाऱ्या चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे.
रणबीर कौन बनेगा करोडपतीचा भाग होतो की नाही हे प्रेक्षकांना काहीच दिवसांत कळेल.