हर्षदीप कौरचा मित्र अमित त्रिवेदीने घेतली स्पर्धकांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 13:04 IST2019-03-06T13:02:17+5:302019-03-06T13:04:12+5:30

हर्षदीप कौरने आपला जिवलग मित्र आणि देशातील आघाडीचा संगीतकार अमित त्रिवेदी याची मदत घेऊन आपल्या संघातील उमेदवारांना प्रशिक्षण दिले आहे.

Amit Trivedi helps Harshdeep Kaur on The Voice | हर्षदीप कौरचा मित्र अमित त्रिवेदीने घेतली स्पर्धकांची भेट

हर्षदीप कौरचा मित्र अमित त्रिवेदीने घेतली स्पर्धकांची भेट

'द व्हॉइस'मध्ये आता स्पर्धा तीव्र बनत चालली असून स्पर्धकांना आपल्या संघातील प्रतिस्पर्ध्यांशी चांगलीच स्पर्धा करावी लागत आहे. या युद्धासाठीच या कार्यक्रमातील प्रशिक्षक अदनान सामी, हर्षदीप कौर, अरमान मलिक आणि कनिका कपूर यांनी आपापल्या संघातील स्पर्धकांना प्रशिक्षण दिले आहे. या प्रत्येक प्रशिक्षकाने एका विख्यात संगीतकारांची मदत घेऊन आपल्या संघातील स्पर्धकांना व्यावसायिक गाणे कसे गायचे, त्याचे प्रशिक्षण दिले आहे. हर्षदीप कौरने आपला जिवलग मित्र आणि देशातील आघाडीचा संगीतकार अमित त्रिवेदी याची मदत घेऊन आपल्या संघातील उमेदवारांना प्रशिक्षण दिले आहे.


यासंदर्भात हर्षदीप कौर म्हणाली, 'माझा अत्यंत प्रिय मित्र आणि विख्यात संगीतकार अमित त्रिवेदी याने इथे येऊन माझ्या संघातील स्पर्धकांची भेट घेतली, याचा मला अतिशय आनंद झाला आहे. अमितची भेट घेऊन त्याच्याशी गप्पा मारताना हे स्पर्धक भारावून गेले होते. माझ्या संघातील स्पर्धकांना आपल्या पूर्ण क्षमतेने गाण्यास तयार करण्यात अमितच्या सल्ल्याची बहुमोल मदत झाली आहे.'


स्टार प्लसवरील 'द व्हॉइस' या कार्यक्रमात हर्षदीप कौर आणि अमित त्रिवेदी या संगीत क्षेत्रातील दोन दिग्गजांना एकत्र आलेले पाहताना प्रेक्षकांना फार रंजक वाटेल. कार्यक्रमातील स्पर्धकांच्या गाण्यांच्या अप्रतिम सादरीकरणामुळे प्रेक्षक या कार्यक्रमाला खिळून बसले आहेत.

Web Title: Amit Trivedi helps Harshdeep Kaur on The Voice