'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याची फादर्स डे निमित्त पोस्ट, म्हणाला, "तूच माझा पहिला सुपरहिरो..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 11:11 IST2025-06-15T11:11:25+5:302025-06-15T11:11:47+5:30

काही वर्षांपूर्वीच अमित भानुशालीच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या आठवणीत अमितने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

amit bhanushali shared post on fathers day says baba you are my first superhero | 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याची फादर्स डे निमित्त पोस्ट, म्हणाला, "तूच माझा पहिला सुपरहिरो..."

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याची फादर्स डे निमित्त पोस्ट, म्हणाला, "तूच माझा पहिला सुपरहिरो..."

जून महिन्यातील दुसऱ्या रविवारी 'फादर्स डे' साजरा केला जातो. सोशल मीडियावर अनेक जण वडिलांचे फोटो शेअर करत फादर्स डे च्या शुभेच्छा देतात. 'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारा  अभिनेता अमित भानुशालीच्या (Amit Bhanushali) वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं. बाबांच्या आठवणीता त्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता अमित भानुशालीने वडिलांसोबतचा फोटो शेअर करत लिहिले, "बाबा, मी तुझा मुलगा आहे याचा मला अभिमान वाटतो. बाबा...तुझं नाव घेतलं की एक वेगळीच ऊर्जा मिळते. तुझं मूक प्रेम, तुझा आधार आणि तुझं कायमच मागे उभं राहणं...हे सगळं शब्दात सांगणं अशक्य आहे. आज फक्त तुझं नाही तर प्रत्येक पावलागणिक तुझ्या आठवणींचंही सेलीब्रेशन आहे. हॅपी फादर्स डे बाबा. तूच माझा पहिला सुपरहिरो आहेस आणि कायम राहशील."


काही दिवसांपूर्वीच अमित 'शिट्टी वाजली रे' या मराठी रिएलिटी शोमध्ये आला होता. तिथे तो वडिलांबद्दल बोलताना भावुक झाला होता. त्याच्या वडिलांनी कायम त्याला करिअरमध्ये पाठिंबा दिला. मात्र अनेक ऑडिशन्स देऊनही अमितला काम मिळत नव्हतं. तो अखेर नोकरी करणार होता. तेव्हा वडिलांनीच त्याला नोकरी करु नकोस, अभिनयातच करिअरसाठी प्रयत्न कर असं सांगत पाठिंबा दिला होता. आता अमितला मालिकेमुळे एवढं यश मिळालं मात्र हे पाहण्यासाठी त्याचे वडील या जगात नाहीत... हे सांगताना अमितला अश्रू अनावर झाले होते. 

Web Title: amit bhanushali shared post on fathers day says baba you are my first superhero