'ठरलं तर मग'मधील अर्जुनच्या भूमिकेसाठी अमित भानुशालीनं घटवलं तब्बल १७ किलो वजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 16:04 IST2022-12-03T16:04:03+5:302022-12-03T16:04:24+5:30
Tharala Tar Mag : ५ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ठरलं तर मग मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

'ठरलं तर मग'मधील अर्जुनच्या भूमिकेसाठी अमित भानुशालीनं घटवलं तब्बल १७ किलो वजन
स्टार प्रवाहवर ५ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ठरलं तर मग मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली अर्जुन सुभेदार ही व्यक्तिरेखा साकारणार असून या भूमिकेसाठी त्याने तब्बल १७ किलो वजन कमी केलं आहे.
ठरलं तर मग मालिकेतील भूमिकेबद्दल अमित भानुशाली म्हणाला की, या मालिकेत मी अर्जुन सुभेदार ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. ही भूमिका साकारण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आता पर्यंत मी रोमॅण्टिक हिरोची भूमिका साकारली आहे. या मालिकेतील पात्र आजवर साकारलेल्या भूमिकांच्या पूर्णपणे वेगळे आहे. अर्जुन एक नामांकित वकील आहे. खूप कमी बोलणारा आणि कडक शिस्तीचा. एक अभिनेता म्हणून ही व्यक्तिरेखा साकारताना माझी कसोटी लागतेय. आमचे दिग्दर्शक सचिन गोखले मला हे पात्र उभं करण्यासाठी खूप मदत करत आहेत. स्टार प्रवाहसोबत मी मन उधाण वाऱ्याचे ही मालिका केली होती. ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा या वाहिनीसोबत काम करताना प्रचंड आनंद होत आहे.
तो पुढे म्हणाला की, ठरलं तर मग मधला अर्जुन साकरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आव्हान माझ्यासाठी होतं ते म्हणजे वजन कमी करण्याचं. मी या भूमिकेसाठी जवळपास १७ किलो वजन कमी केलं आहे. भूमिकेची तशी गरज होती. अर्जुन वकील जरी असला तरी त्याला खेळाची आणि फिटनेसची आवड आहे. खऱ्या आयुष्यातही फिटनेसच्या बाबतीत मी खूपच जागृक असतो. शूटिंगचा कॉल टाईम कितीचाही असला तरी त्याआधीचे दोन तास मी जिमसाठी देतोच. शाळेत असल्यापासूनच फिटनेसचं वेड मला आहे. याचा उपयोग मला ही व्यक्तिरेखेसाठी सुद्धा झालाय. मालिकेत अर्जुनचे बरेचसे सीन प्रेक्षकांना पाहायला मिळतील ज्यात त्याचं फिटनेसविषयीचं प्रेम अधोरेखित होईल.