अमन वर्माचे लग्न लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 17:47 IST2016-04-20T12:17:15+5:302016-04-20T17:47:15+5:30
टीव्ही अभिनेता अमन वर्मा आज २० एप्रिल रोजी टीव्ही अभिनेत्री वंदना लालवानी हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार होता. मात्र हा विवाह ...

अमन वर्माचे लग्न लांबणीवर
ट व्ही अभिनेता अमन वर्मा आज २० एप्रिल रोजी टीव्ही अभिनेत्री वंदना लालवानी हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार होता. मात्र हा विवाह सोहळा लांबणीवर पडला आहे. अमनचे वडील वाय.के. वर्मा यांचे गत महिन्यात एका कार अपघातात निधन झाले. वडिलांच्या अचानक झालेल्या मृत्यूच्या धक्क्यातून अमन व त्याचे कुटुंबीय अद्यापही सावरलेले नाही. त्यामुळे त्याने लग्न लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. अमन व वंदना दिल्लीत एका खासगी सोहळ्यात लग्न करणार, अशी बातमी होती. मात्र हा सोहळा कधीच दिल्लीत होणार नव्हता. तो लांबणीवर टाकण्यात आलाय आणि हा सोहळा मुंबईतच होणार, असे अमनने स्पष्ट केले.