ऑलमोस्ट सुफळ संपूर्णने गाठला ३०० भागांचा टप्पा, दणक्यात केले सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 16:07 IST2020-10-14T16:07:37+5:302020-10-14T16:07:57+5:30
ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका प्रेक्षकांच्या पुरेपूर पसंतीस उतरलीये. या मालिकेमधल्या नचिकेत, सई आणि अप्पा केतकर या तीन व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी त्यांच्या मनात कायमची जागाही दिली.

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णने गाठला ३०० भागांचा टप्पा, दणक्यात केले सेलिब्रेशन
छोट्या पडद्यावरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका प्रेक्षकांच्या पुरेपूर पसंतीस उतरलीये. या मालिकेमधल्या नचिकेत, सई आणि अप्पा केतकर या तीन व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी त्यांच्या मनात कायमची जागाही दिली. सई आणि नचिकेत यांच्या प्रेमामधली लपवाछपवी पहाताना प्रेक्षकांनाही मजा येतेय त्यात अप्पांची लुडबूड या मजेमध्ये भरच पाडतेय. यातच सई, नचिकेत आणि नचिकेतची थेट ऑस्ट्रेलियावरुन आलेली मैत्रीण कॅडी यांचा प्रेमाचा त्रिकोण बनणार नाही ना असे विचार करता करता प्रेक्षकांची दमछाक होतेय आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मालिकेला मिळणारा चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद.
पाहता पाहता या मालिकेने ३०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला आहे.नुकतंच या मालिकेच्या ३००व्या भागाचं प्रक्षेपण झालं आणि हा आनंद कलाकारांनी सेटवर साजरा केला. या मालिकेतील अप्पा म्हणजेच अभिनेता सुनील गोडबोले या आनंदाच्या क्षणी म्हणाले, "प्रेक्षकांचं अविरत प्रेम आणि पाठिंब्यामुळे ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेने ३०० मालिकांचा यशस्वी टप्पा गाठला. प्रेक्षकांनी आजवर या मालिकेला जो प्रतिसाद दिला असाच पुढेही ते राहतील याची मला खात्री आहे."
सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये मास्कचे महत्व आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये किती अनन्य साधारण आहे हे वेगळे सांगायला नको. ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेमधली सई आणि नचिकेतची गोड जोडी असो किंवा घरातले आदरणीय अप्पा केतकर असोत. मुंबईतल्या संदेश नागांवकर यांचं उदाहरणच बघा ना. झी युवावरच्या या मालिकांचे आणि यातल्या कलाकारांचे संदेश डायहार्ड फॅन आहेत आणि त्यांनी आता त्यांच्या या आवडत्या कलाकारांची आणि व्यक्तिरेखांची छायाचित्रं असलेले मास्क आता चक्क बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेत. ज्यात या लोकप्रिय व्यक्तिरेखांची छायाचित्रे तुम्हाला पहायला मिळतातच सोबत त्यांचे आवडते डायलॉग्ज, पंचलाईन्स किंवा वनलाईनर्स पण वाचायला मिळतात. मुंबईमध्ये सध्या संदेश नागांवकर यांच्या दुकानामध्ये हे आकर्षक मास्क सध्या विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेत.