इमरान हाश्मीसोबत काम केल्यांनंतर अक्षया नाईकच्या हाती लागला नवा प्रोजेक्ट, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:46 IST2026-02-18T11:45:22+5:302026-02-18T11:46:15+5:30

'तस्करी : द स्मगलर्स वेब' या सीरिजनंतर अक्षयाच्या हाती आणखी एक प्रोजेक्ट लागला आहे.

Akshaya Naik Will Be Seen In This Hindi Serial After Emraan Hashmi Taskaree: The Smuggler's Web | इमरान हाश्मीसोबत काम केल्यांनंतर अक्षया नाईकच्या हाती लागला नवा प्रोजेक्ट, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

इमरान हाश्मीसोबत काम केल्यांनंतर अक्षया नाईकच्या हाती लागला नवा प्रोजेक्ट, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली 'तस्करी : द स्मगलर्स वेब' ही सीरिज प्रचंड गाजली आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेता इमरान हाश्मी, शरद केळकर, अमृता खानविलकर, नंदीश संधू हे प्रमुख भूमिकांत आहेत. अभिनेत्री अक्षया नाईकदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे. तिने या वेब सीरिजमध्ये स्वाती साळुंखे ही भूमिका साकारली. तिनं साकारलेली स्वाती साळुंखे ही लेडी स्मगलरची भूमिका प्रेक्षकांना भावली. आता या सीरिजनंतर अक्षयाच्या हाती आणखी एक प्रोजेक्ट लागला आहे.

अक्षया  लवकरच अँड टीव्हीवरील 'हे भगवान कितना बदल गया इंसान' या आगामी मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेत तिची भूमिका नेमकी कशी असेल, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे अक्षयाने तिच्या करिअरची सुरुवातच सुद्धा हिंदी मालिकेतून केली होती. यानंतर पुढे मराठी मालिका मग ओटीटी असा तिचा दमदार प्रवास राहिला आहे. 


अक्षयानं २०१४ साली 'मेरे रंग में रंगनेवाली' या हिंदी मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. अक्षयाने हिंदीतील लोकप्रिय मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्येही भूमिका साकारली होती. त्यानंतर मराठी मालिका 'सुंदरा मनामध्ये भरली'मध्ये तिनं काम केलं. याशिवाय तिने आणखी काही प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे.
 

Web Title : इमरान हाशमी के बाद अक्षया नाइक को मिला नया प्रोजेक्ट, दिखेंगी अहम भूमिका में

Web Summary : इमरान हाशमी के साथ 'तस्करी: द स्मगलर्स वेब' में काम करने के बाद, अक्षया नाइक जल्द ही एंड टीवी के 'हे भगवान कितना बदल गया इंसान' में दिखेंगी। उन्होंने पहले 'मेरे रंग में रंगने वाली' और 'ये रिश्ता क्या कहलाता है' में अभिनय किया था।

Web Title : Akshaya Naik lands new role after working with Emraan Hashmi.

Web Summary : Following her role in 'Tuskari: The Smugglers Web' with Emraan Hashmi, Akshaya Naik will star in '& TV's 'Hey Bhagwan Kitna Badal Gaya Insaan'. She previously starred in 'Mere Rang Mein Rangne Wali' and 'Yeh Rishta Kya Kehlata Hai'.