अक्षया देवधर या कारणांमुळे दिसत नाहीये कोणत्याही चित्रपट, मालिकेत; खुद्द हार्दिक जोशीने सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 15:46 IST2023-10-28T15:46:03+5:302023-10-28T15:46:59+5:30
Hardik Joshi : हार्दिक जोशीने अक्षया कोणत्याही मालिका किंवा चित्रपटात काम का करत नाहीये यामागचं कारण एका मुलाखतीत सांगितलं.

अक्षया देवधर या कारणांमुळे दिसत नाहीये कोणत्याही चित्रपट, मालिकेत; खुद्द हार्दिक जोशीने सांगितलं कारण
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून पाठक बाई आणि राणादा म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) घराघरात पोहचले. या मालिकेतून त्या दोघांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेतील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली. त्यांनी खऱ्या आयुष्यात एकत्र येत चाहत्यांना सुखद धक्का दिला. काही महिन्यांपूर्वी त्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर हार्दिक तुझेच मी गीत गात आहे मालिकेत पाहायला मिळाला. मात्र अक्षया कुठे काम करताना दिसली नाही. दरम्यान आता हार्दिकनेच आता यामागचं कारण सांगितले आहे.
हार्दिक जोशीने अक्षया कोणत्याही मालिका किंवा चित्रपटात काम का करत नाहीये यामागचं कारण एका मुलाखतीत सांगितलं. कलाकृती मीडिया या युट्यूब चॅनेलशी बोलताना हार्दिक म्हणाला, 'लग्न झाल्यापासून मी वर्षभर घरात नाही आहे. लग्नानंतर पुण्यात गेल्यानंतर देवीच्या, प्रेक्षकांच्या आणि परमेश्वराच्या कृपेने मी सतत काम करतो आहे. ती एक स्त्री पाठिशी उभी आहे, ती समजून घेते आहे आणि तिने स्वतःची कामे थांबवली आहेत.
तो पुढे म्हणाला की, अक्षयाचं म्हणणं आहे की, तू पहिला सेट हो, तू ये, मग मी काम करते. त्यामुळे ती मालिका किंवा चित्रपटांत दिसत नाहीये.' तर दुसरीकडे नवरात्री निमित्त राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अक्षयाने ती लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले. ती एक काम करत आहे, मात्र ते प्रेक्षकांसमोर येण्यास वेळ लागतोय, असे तिने सांगितले.